बीड
Beed district collector orders jamavbandi जिल्ह्यात सुरू असलेल्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि होत आंदोलने या कारणाने जिल्ह्यात एक मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिले आहेत.
मराठा, ओबीसी, धनगर, समाजाचे वतीने आरक्षण मागणी अनुषंगाने आंदोलने चालु आहेत. तसेच मराठा आरक्षाणाचे मागणी साठी मनोज जरांगे हे मराठा समाजाला सोबत घेवुन सामुहिक साखळी उपोषण करत आहेत. सध्या बीड जिल्हयामध्ये पोस्टे केज येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने आरोपीतांना कठोर शासन व्हावे या मागणी करीता अचानक आंदोलन करत आहेत.
राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांचे न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने, उपोषण मोर्च इत्यादी होण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 11/02/2025 पासून इयत्ता बारावीची बोर्डाची परिक्षा सुरु झाली असुन 21/02/2025 पासून दहावी बोर्डाचे परिक्षा सुरु होत आहेत. यामुळे अचानक घडणारे घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच कालावधीत आरक्षणाचे मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता म.पो.अधि.-1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागु करणे अत्यंत आवश्यक असून दिनांक 15.02.2025 रोजीचे 00.01 वाजेपासुन ते दिनांक 01.03.2025 चे 24.00 वाजेपर्यंत चे काळात बीड जिल्ह्यात मु.पो. अधि. चे कलम 37 (1) (3) लागु करणेस विनंती करुन सदर कालावधीकरीता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे या सारखे आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही ” या निबंधाचा समावेश करणे बाबत विनंती केली आहे.
आणि ज्याअर्थी, मा. पोलीस अधीक्षक, बीड यांचे अहवालावरुन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे या आदेशाव्दारे शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
- शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.
- लाठ्या, काठ्या, शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु, साहीत्य बाळगणार नाहीत.
- कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.
Police Act 1951 37-1-3 Order
- दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे गोळा करुन ठेवणार नाहीत, बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.
- प्रक्षोभक भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे जिल्हयाची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु, साहित्य जवळ बाळगणार नाहीत.
- जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जी देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल अशी कृती करणार नाहीत. तसेच जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.
. व्यक्ती, शव, प्रेत, आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. 7
- पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही.
सदर आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 15.02.2025 रोजीचे 00.01 वाजेपासून ते दिनांक 01.03.2025 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागु राहणार नाहीत. अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरी शिवाय 15 दिवसांपेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही.
तसेच या आदेशाचे पालन करुन कोणाताही मोर्चा, सभा, मिरवणूक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिका-याची पूर्वमान्यता घेणे आवश्यक असेल.