आष्टी तालुक्यातील खुंटेफळ उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ
आष्टी : प्रतिनिधी
beed devendra fadnavis khuntephal project महाराष्ट्रातील अनेक गावांनी दुष्काळ सोसलेले आहेत. २०१८ च्या दुष्काळानंतर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बऱ्यापैकी गावे पाणीदार झाली. आताच्या पिढीने दुष्काळ पाहिलेला असला तरी पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही त्या अनुषंगाने सरकार काम करत आहे राज्यातील सर्व दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आणि शेती समृद्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विजेचा खर्च टाळण्यासाठी राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील बहुचर्चित आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या व आमदार सुरेश धस यांचा ड्रीम प्रोजेक्ट कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत खुंटेफळ उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे , खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके विजयसिंह पंडित ,संदीप क्षीरसागर,नमिता मुंदडा माजी आमदार साहेबराव दरेकर,भीमराव धोंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले, मराठवाड्यासह या खोऱ्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील दुष्काळी भागाला कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळाले पाहिजे, असा विचारपूर्वी पुढे आला त्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर या खोऱ्यातून 23 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे असा निर्णय केला. मात्र त्यानंतर काही कारणाने हा निर्णय पुढे जाऊ शकला नाही.
मी मुख्यमंत्री झाल्यावर असे लक्षात आले की 23 टीएमसी पाण्यापैकी केवळ सात टीएमसी पाणी असून राहिलेले पाणी दिसतच नव्हते. पाण्याचे नियोजन झाले नव्हते मुख्यमंत्री म्हणून मग मी त्यावेळी बैठक घेऊन मान्यता दिली आणि सीना कोळेगाव मध्ये पाणी आणण्याबाबत काम सुरू झाले.
आता ही कामे वेगाने पूर्ण होणार आहेत. दुष्काळी भागातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धी आणायची आहे. त्यासाठीच आम्ही काम करत आहोत 2018 मध्ये राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता या दुष्काळात आम्ही जलयुक्त शिवार च्या माध्यमातून शिवार समृद्ध करण्याचं काम केलं. समुद्रात वाहून जाणारे पश्चिमी वाहण्याचं पाणी दुष्काळी भागाला मराठवाड्याला देण्याची योजना आम्ही पूर्ण करणार आहोत.
त्यातून सुमारे 53 टीएमसी पाणी मिळणार आहे. गोदावरी उपखोरयाचा एकात्मिक आराखडा आम्ही त्यावेळी तयार केला. समुद्रात वाहून जाणारे पाणी जर गोदावरीच्या उपखोऱ्यात आणून पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही असे सरकारने ठरवले आहे. कारण हे पाणी गोदावरी खोऱ्यात आल्यावर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील पाणी संघर्ष निश्चित थांबणार आहे.
उपसा सिंचन योजनेसाठी वीज बिलाचा प्रश्न सातत्याने तयार होतो ते बिल कोणी भरायचे यावरून वादंग होतात. त्यामुळे आता राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना ह्या सौर ऊर्जेवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की त्यांनी विजेबाबत स्वतंत्र कंपनी तयार केली.
त्या कंपनी अंतर्गत १६ हजार मेगावॅटचे फिडरचे सोलरायझेशन करत असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. साधारण मार्च 2027 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मिळेल. राज्यात शेतकऱ्यांना १६ हजार मेगावॅट वीज द्यावी लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोलर चे काम पूर्ण झाल्यानंतर ती वीज आठ रुपये युनिटची नसून केवळ तीन रुपये युनिटची असेल.
त्यामुळे शेती पंपाच्या विजय नंतर उद्योग आणि घरगुती वापरातील विजेचे दरही कमी होण्याला मदत होणार आहे. महाराष्ट्रातील वर्षानुवर्ष दुष्काळी असलेल्या भागाला पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या मानदेशावर अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्या दुष्काळी भागाला आज आपण दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचा आनंद आहे असेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भात आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले, मी विश्वास देतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे कोणी दोषी आढळतील त्या कोणालाही सोडले जाणार नाही. बीडमध्ये आपणा सर्वांना एकत्रित नांदायचे आहे. बीडचा गौरवशाली इतिहास पुढे न्यायचा आहे.
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मेरा वचन, मेरा शासन हे आमच्या रक्तात नाही, आम्हीही इज्जत देतोत आत्ताच्या सभेत आमदार धस यांनी 2003 चा सैनिकी चालण्याचा किस्सा सांगितला. आणि या ठिकाणी सैनिकी छावण्या करायचा नाही आणि येथे शेतक-यांसाठी प्रकल्प करायचा असे स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केले.
मी विकासासाठी मला पत्रिका नाव असून किंवा नसो मी विकासासाठी कुणाच्याही बॅनरवर फोटो नसला तरी मी येणार म्हणजे येणारच आणि विकास कामांसाठी कधीही मागे हटणार नसल्याचे ना. पंकजा मुंडे यांनी सांगितले.
आमदार सुरेश धस म्हणाले, दि.23/8/2007 ला या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली आणि 13/1/2009 रोजी सर्व्हेक्षण केले आणि त्या सर्व्हेक्षणाच्या वेळी 400 लोकं दगडं घेऊन मागे लागले होते.
आज या कामासाठी अजित पवार, पंकजा मुंडे, माजी खा. प्रितम मुंडे, माजी मंत्री रामदास कदम यांचे सहकार्य लाभले आहे. मी 2014 ला पराभुत झालो त्यानंतर 10 वर्षात फक्त तलावाचे भिंतीचे काम फक्त दोन टक्केच काम झाले असल्याचे आमदार धस यांनी सांगत आम्ही सत्तेत आल्यानंतर 23 टक्के या तलावाचे काम पुर्ण केले आहे.
तसेच मतदारसंघाला भरपुर देण्याची दानत फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात आणि आमची अपेक्षा पण दुसरी कुणाकडून नसल्याचे सांगत पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.
दिवार चित्रपटाचा डॉयलॉग सांगत माझ्याकडे काहि नसले तरी चालेल पण मला मंत्रिपद नको,पालकमंत्री पद नको आणि मला फक्त मतदार संघाला 4.68 टिएमसी आणि 3.5 टिएमसी पाणि द्यावे आणि माझ्यामागे देवेंद्र बाहुबली असल्याचे सांगितले.
माजी आ. साहेबराव दरेकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनच हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गी लावण्यासाठी काम हाती घेतले असून ह्या प्रकल्पात 4.68 टिएमसी पाणि मिळाले तर हा मतदारसंघच सुजलाम सुफलाम होईल. तसेच या मतदार संघ हा भौगोलिक भाग हा आमचा तालुका हा नगर जिल्ह्यात आहे.
फडणवीस साहेबांनी भविष्यात आमचा तालुका नगर जिल्ह्यात जोडावा अशी मागणी माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी केली. कडा सहकारी साखर कारखानाचे माजी चेअरमन विष्णुपंत चव्हाण म्हणाले, या प्रकल्पासाठी आमदार सुरेश धस जिवाचे रान करून मंजूर करत पाणी आणले आणि आता या मतदारसंघात कारखाना मंजूर करून द्यावा अशी विनंती ही चव्हाण यांनी केली.
जलसंपदा खात्याचे अपर सचिव दीपक कपूर यांनी या योजनेची संपूर्ण माहिती देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.