आष्टी
Ashti assembly kukadi water issue कुकडीचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे तसेच आष्टी तालुक्यातील या भागातील जमिनी वाचवण्यासाठी मीच मुंबई आणि दिल्लीपर्यंत पायी मोर्चे काढले हे दोन्ही अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले असे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे झालेल्या काॅर्नर बैठकीत सांगितले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आहे. उमेदवारांची धावपळ सुरू आहे. गावागावात काॅर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पिंपरी घुमरी येथे झालेल्या काॅर्नर बैठकीस महादेव पांडूळे, रामदास परकाळे,सरपंच विजय पांडूळे, लक्ष्मण झगडे, संभाजी पांडूळे, देविदास परकाळे, भाऊसाहेब नवले, भरत गोरे, परसराम परकाळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मतदारसंघातील गोरगरिबांच्या मुला मुलींना गावातच शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचे जाळे निर्माण केले. विकासाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेणाऱ्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असे आव्हान माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले. सरपंच विजय पांडूळे यांनी सांगितले की, अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी यापुर्वी चार वेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.
शेतकऱ्यांऱ्यांसाठी आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढून आपल्या बागायती जमिनी वाचविल्या, त्यांच्या पायी मोर्चाची जागतिक पातळीवर नोंद झाली.
तसेच मतदारसंघातील गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी मतदारसंघात शिक्षणाची गंगा आणली असे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या शिट्टी या चिन्हाला मतदान करुन त्यांना विजया करा असे आवाहन पांडूळे यांनी केले.