,
मा. आ. भीमराव धोंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
आष्टी ( प्रतिनिधी )
Ashti assembly independent candidate bhimrao dhonde आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघातील सर्व मतदार हे आमदारकीचे उमेदवार आहेत असे समजून प्रत्येकाने आपल्या गावोगावी व्यवस्थित मतदान करण्यासाठी फेऱ्या काढाव्यात, जनजागृती करावी व ” शिट्टी ” या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला निवडून द्यावे. शिट्टीच्या आवाजाने आष्टी परिसर दणाणून गेला. प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आष्टीत तिन्ही तालुक्यातील जनसागर उसळला होता. आष्टी शहरात ऐतिहासिक रोड शो झाला.मतदार संघातील दहशत निपटून काढण्यासाठी मतदारांनी सज्ज व्हावे असे आवाहन मा.आ. भीमराव धोंडे.
यांनी केले.
आष्टी येथील बाजार तळावर आयोजित प्रचार शुभारंभाच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती ॲड. साहेबराव मस्के होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सौ. दमयंतीताई धोंडे, युवा नेते डॉ. अजयदादा धोंडे, जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, जि. प. सदस्य रामराव खेडकर, रामदास बडे,वर्षाताई माळी,
अशोकराव सव्वाशे,ॲड. रत्नदीप निकाळजे,अभयराजे धोंडे, माजी सरपंच बबनराव औटे, माजी सरपंच बाळासाहेब पवार,माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड,रिपाई नेते अशोक साळवे, विठ्ठलराव बनसोडे,माजी सभापती नियामत बेग,सरपंच दादासाहेब जगताप, पांडुरंग गावडे, हरिभाऊ जंजिरे, किशोर खोले, राजपाल शेंडगे, गौतम ससाने, दिलीपराव काळे, माऊली पानसंबळ, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, देविदास शेंडगे,ॲड. खेडकर, ज्ञानदेव केदार, दिलीपराव म्हस्के, युवराज सोनवणे, रघुनाथ शिंदे व इतरांची उपस्थिती होती. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करीत नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जलजीवन कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असा घनाघाती आरोप मा. आ. भीमराव धोंडे यांनी विरोधकांवर केला. मतदारसंघात त्यांना भ्रष्टाचाराचे महामेरू म्हणून ओळखले जाते अशी टीकाही त्यांनी केली. माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मी रस्ते, पिण्याचे पाणी, पाझर तलाव अशी अनेक विकासाची कामे केली. मतदार संघात १ हजार पाझर तलाव बांधले. कोणावरही अन्याय झाला तरी आम्ही त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी धावून जाऊ मात्र त्यासाठी आपल्याला ही निवडणूक अत्यंत बहादुरीने लढावी लागणार आहे. ही निवडणूक तशी सोपी नाही मात्र निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.सकाळी दहा वाजल्या पासूनच आष्टी,पाटोदा, शिरूर तालुक्यातील जनसमुदाय आष्टीकडे येत होता . त्यामुळे नगर – बीड रस्त्यावर मोठ्या संख्येने चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी झाली होती. दुपारी १२ वाजल्या पासून प्रमुख कार्यकर्ते व मतदार संघातील लोकांसह मा. आ. भीमराव धोंडे यांच्यासह कार्यकर्ते यांचा रोड शो झाला. रोड शोमध्ये मतदार संघातील अठरा पगड जातीचे लोक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. ढोल, ताशा व हलगीच्या तालावर आपापल्या हातातील झेंडे मिरविणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध वाहनांचा ताफा, विविध रंगाचे झेंडे, कार्यकर्त्यांची झुंबड, लोकांची गर्दी, शिट्यांचा आवाज आणि महिलांची सभेला लक्षणीय उपस्थिती होती . रोड शोमध्ये कार्यकर्त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे व लोकनेत्या पंकजा मुंडे यांचे फोटो घेऊन मिरवत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, २००९ मध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांना सहकार्य केले. गेल्या लोकसभेला आ. पंकजाताई मुंडे यांना सहकार्य केले. भारतीय जनता पक्षाचे काम अवघड झाले आहे. माझा पक्ष भीमराव धोंडे हेच आहेत. माजी आमदार भीमराव धोंडे म्हणजे शांतता असते व विकास असतो.जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार असतो भांडणे लावण्यासाठी नसतो. ते शेतकऱ्यांसाठी पायी दिल्लीला गेले. कुकडीच्या पाण्यासाठी मुंबईला पायी गेले. शैक्षणिक संस्थामुळे ग्रामीण भागातील मुली आपापल्या गावात शिकु लागल्या आहेत. आ. पंकजाताई मुंडे आपला पक्ष आणि माजी आमदार भीमराव धोंडे हे आपले नेते आहेत.
उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी सांगितले की, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मा. आ.भीमराव धोंडे यांनी सहकार्य केले इतर कोणीही सोबत नव्हते. भीमराव धोंडे यांनी मुंडे घराण्याशी कधीही विश्वासघात केला नाही. ज्यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे, आ. पंकजाताई ताईंना त्रास दिला त्यांच्या बदल्याची निवडणुक आहे. खरोखरच पाटोदा तालुक्यातील रस्ते विकास मा. आ. भीमराव धोंडे यांनी केला. युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, आपली शिट्टी २३ नोव्हेंबर पर्यंत वाजली पाहिजे. आणि २३ नोव्हेंबरला आपल्याला विजयाचा गुलाल घ्यायचा आहे. तरुणांनो आपापले बुथ व्यवस्थित सांभाळा, काही अडचण आल्यास थेट मला संपर्क करा. प्रास्ताविक करताना ॲड. रत्नदीप निकाळजे यांनी सांगितले की, असाच उत्साह आपल्यात ठेवा व शिट्टीचा आवाज विधानसभेत पाठवा, सरपंच दादासाहेब जगताप यांनी सांगितले की,आजच विजय झाला आहे एवढी प्रचंड सभा आहे.राजपाल शेंडगे म्हणाले की,आपले उमेदवार स्वच्छ, शांत स्वभावाचे आहेत. येणारा काळ संघर्षाचा आहे त्यामुळे अजयदादा यांनी वाल्मिक कराड व्हावे. माजी सरपंच बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, मतदारसंघात विकास व शांतता ठेवण्यासाठी भीमराव धोंडे यांना आमदार करा.माऊली पानसंबळ यांनी सांगितले की,एवढी गर्दी हिच विजयाची नांदी आहे. माजी जि. प. सदस्य अशोकराव सव्वाशे यांनी सांगितले की, आपल्यासाठी चांगले वातावरण आहे आपला विजय निश्चित आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडा.
जि. प. सदस्य रामराव खेडकर यांनी सांगितले की, राज्यात अपक्षांचे सरकार येणार आहे. माजी आ. धोंडे यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही म्हणून त्यांना मतदान करा. भीमराव धोंडे हे कोणालाही धोका देणारे नाहीत.
माजी सरपंच संतोष चव्हाण यांनी सांगितले की, मतदारसंघात काही उपद्रवी लोक आहेत त्यांना वेळीच रोखले पाहिजे. रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी सांगितले की, ना. रामदास आठवले व जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे माझ्या हृदयात आहेत.माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड या म्हणाल्या की,या निवडणुकीत माजी आ. भीमराव धोंडे यांना साथ द्या,लोकसभा निवडणुकीतील विश्वासघात जनता विसरली नाही.
युवा नेते अशोकराव दहिफळे यांनी सांगितले की, सध्या कोठेही जा पण पण २० तारखेला एकत्र या. याप्रसंगी लालाभाऊ कुमकर, नियामत बेग, पांडुरंग गावडे, गौतम ससाणे, सईद चाऊस, देविदास शेंडगे,योगिताताई गवळी व इतरांची भाषणे झाली. कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य सतिष झगडे,मोहनराव घुले, काकासाहेब लांबरुंड, भगवान तळेकर, विकी शेकडे, मुरलीधर पाचे, सुदाम झिंजुर्के, तुकाराम चव्हाण, नईम शेख, संजय कांकरिया, सरपंच सावता ससाणे, दादासाहेब विधाते, युवराज कटके, आस्ताक शेख, सरपंच अभय गर्जे, हादी शेख, आण्णासाहेब लांबडे, केदार जगताप, झुंबर चव्हाण, बाबुराव कदम, संजय सानप, अरुण सायकड, महारूद्र खेडकर , एकलव्या संघटनेचे रावसाहेब पिंपळे, सुधीर ढोबळे, आजिनाथ गवळी, चेअरमन दादासाहेब हजारे,आस्ताक शेख, हादी शेख यांच्या सह प्रचंड जन समुदाय उपस्थित होता. मतदारसंघाच्या वतीने अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे,सौ. दमयंतीताई धोंडे, अजयदादा धोंडे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. रत्नदीप निकाळजे यांनी केले. निलेश दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश बडे यांनी आभार मानले. जाहीर सभेस आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. आष्टी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते दुचाकी रॅलीने आले होते. प्रचार सभेत कडा येथील सुधीर ढोबळे, परमेश्वर खेडकर, सतिश भैय्या आंधळे, विष्णू गोल्हार, तसेच राजु गावडे, बापु मेरगळ, संपत खुरंगे, साईनाथ मेरगळ, ॲड. संभाजी दहातोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला.