आष्टी। प्रतिनिधी
Ashti assembly elections ncp candidate Mehboob shaikh मागिल अनेक दिवसांपासून आष्टी विधानसभा मतदारसंघात तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला होता.महाविकास आघाडी कडून इच्छुक असणारे जवळपास सर्वच इच्छुक उमेदवार मुंबईला ठाण मांडून बसले होते. परंतु महाविकास आघाडी कडून आष्टी विधानसभा मतदारसंघात महेबुब शेख यांना अखेर तुतारी फुंकण्याची संधी मिळाली आहे.उमेदवारी मिळाल्यानंतर आष्टी विधानसभा मतदारसंघात महेबुब शेख यांचे जोरदार स्वागत करण्यात आले जोरदार घोषणाबाजी करत ढोलताशांच्या गजरात जेसीबीतुन पुष्पवृष्टी करत जल्लोषात महेबुब शेख यांचे स्वागत झाले.
आष्टी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत उमेदवारी महेबुब शेख यांना यांना काल जाहीर झाल्यानंतर आष्टी येथे कार्यकर्त्यांनी सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आज सकाळी मतदार संघात महेबुब शेख यांचे सकाळी धानोरा येथे आगमन झाले ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर धानोरा येथील चौकाचौकात रॅली काढून महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
कडा येथे ही जोरदार स्वागत झाले आष्टी शहरात स्वागतासाठी जेसीबीतून महेबुब शेख यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात रॅली किनारा चौकापासून आण्णाभाऊ साठे यांना चौकात अभिवादन करून झाली पुढे,स्व.गोपीनाथ मुंडे चौकात मुंडे साहेबांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले
आष्टी शहरातील सर्व चौकाचौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.यावेळी महेबुब भाई तुम आगे बढो हम तुम्हारेसाथ है जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता यावेळी तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, सुनिल नाथ, विजय गाढवे, राहुल काकडे, दादासाहेब झांजे,दिपक होले, ॲड रिजवान शेख,नदिम शेख, नगरसेवक भिमराव गायकवाड, अंकुश खोटे,जिशान सय्यद, अमोल चव्हाण, भाऊसाहेब मेटे,संतोष सानप,अतुल शिंदे, तौफिक शेख,भैरव चव्हाण, सचिन गोंदकर, सोमनाथ निकाळजे, अंबादास पवार, राजेसाहेब निंबाळकर, सचिन पवार,लहू भवर, शिवाजी शेळके, दत्तात्रय कांबळे,फरमान शेख, माऊली कांबळे, सुधाकर भगत, सोहेल बेग,जमीर पठाण, अस्लम मोगल,जल्लाल शेख, हाफिज मोसिम सय्यद,मुजामिल शेख, अरबाज बेग, महम्मद शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने रॅली सहभागी झाले होते.