शिरूर
Ashti assembly elections Bhimrao dhonde मतदार संघाच्या विकासासाठी माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या शिट्टी या चिन्हाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषदेचे अशोकराव सव्वाशे यांनी केले आहे. आष्टी मतदार संघातील शिरूर कासार तालुक्यात माजी आमदार भीमराव धोंडे यांचा झंजावती दौरा झाला त्या प्रसंगी विविध ठिकाणी झालेल्या सभेत सव्वाशे बोलत होते याप्रसंगी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे, जि. प. रामदास बडे, जि. प. रामराव खेडकर, किशोर खोले, युवराज सोनवणे, बबनराव ढाकणे, अशोक दहिफळे व इतर अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मी मतदारसंघाचा वीस वर्षांत सर्वांगीण विकास केला आहे. २०१४ मध्ये आमदार असताना रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. तसेच पहिल्या टप्प्यात १५ वर्षात विधानसभा सदस्य असताना
मतदारसंघात १ हजार पाझर तलाव केले. मी कधी गुत्तेदारी केली नाही. कोणत्याही कामात कमिशन घेतले नाही. अशोकराव सव्वाशे यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांचे शिट्टी चिन्ह हे पहिल्या मशिनवर शेवटचे चिन्ह आहे. त्यामुळे लक्षात ठेवायला सोपे आहे आणि शिट्टी हे चिन्ह आतापर्यंत घराघरात पोहोचले आहे. या परिसरातील सर्व प्रश्न फक्त माजी आमदार भीमराव धोंडे हेच मार्गी लावतील असा मला विश्वास आहे. विरोधक उमेदवार फक्त आश्वासन देण्यात पटाईत आहेत त्यामुळे कोणीही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नयेत. याप्रसंगी रामदास बडे यांनी सांगितले की, आपल्याला नेहमी ठराविक चिन्हाला मतदान करायची सवय आहे पण यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत त्यांचे चिन्ह शिट्टी आहे. तरी सर्वांनी शिट्टी या चिन्हाला मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले.