आष्टी ,
Ashti aamsabha 2025 दि.15 मार्च 2025 रोजी आष्टी पंचायत समिती आणि दि.16 मार्च 2025 रोजी पाटोदा आणि शिरूर (कासार) येथे आयोजित करण्यात आलेल्या आमसभेमध्ये सर्व घटकातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
आष्टी येथे निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ते म्हणाले सन 2017 नंतर आष्टी पाटोदा आणि शिरूर (कासार) पंचायत समिती येथे आमसभांचे आयोजन करण्यात आले आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत..
मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे मंजूर करण्यात येणार आहेत..
केंद्र शासनाच्या वतीने पूर्वी 30×30×3 या आकारमानाचे 6.50 लक्ष रू.किंमतीचे शेततळे मंजूर होत असत..
परंतु त्यामध्ये बदल करण्यात आला असून यानंतर आता 25×25×3 या आकाराचे 5.00 लक्ष रु. किंमतीचे शेततळे मंजूर करण्यात येणार आहेत.. मग मागणी करण्यात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेततळे मंजूर करण्यात येणार आहे पूर्वीच्या शेततळ्यांच्या प्रशासकीय मान्यता बदलून नवीन प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे त्याबाबतचे आदेश तीनही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे करून घ्यावेत असे आवाहन करून आमदार सुरेश धस पुढे म्हणाले की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्व योजनेतील घरकुले मंजूर करण्यात आली असून सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे मात्र आष्टी तालुक्यातील तीन आणि शिरूर (कासार) तालुक्यातील एका ग्रामपंचायत मध्ये काही लाभार्थ्यांना अडचणी निर्माण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे ..
तथापि घरकुलाच्या यादीतील सन 2014 नंतर प्रपत्र ड मधील दर्शवलेल्या सर्व लाभार्थ्यांना कोणताही राजकीय पक्ष अभिनिवेष ठेवता सर्व लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात येणार आहेत
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एका गावामध्ये 20 पेक्षा अधिक कामे मंजूर करता येत नाहीत त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना याबाबतचे अधिकार नसल्यामुळे त्यांच्या ऐवजी विभागीय आयुक्त यांचेकडून मंजुरी घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आगामी काळामध्ये सर्व मजुरांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या त्यांना काम उपलब्ध करून देण्यात येईल..
या आणि अशा सर्व मागण्यांबाबत आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार) या तीनही तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नागरिक ग्रामस्थांनी या आम सभांमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले मत मांडावे असे आवाहनही शेवटी त्यांनी केले आहे