ambedkar jayanti 

ताज्या बातम्या

कड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

By admin

April 14, 2023

 

कडा

ambedkar jayanti  भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न तथा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती बीड जिल्ह्यात सार्वजनिक स्वरूपात आणि शाळा महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

आज सकाळी अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, युवराज पाटील, आदी उपस्थित होते.

शासकीय योजना आनंदाची मोठी बातमी शासनाचा नवा उपक्रम Maharashtra government Yojana

यावेळी प्रथम पंचशील् ध्वजाचे ध्वजारोहण आमदार सुरेश धस यांच्या हस्ते  करण्यात आले . त्यानंतर त्रिशरण, पंचशील आणि प्रार्थना करण्यात आली. यावेळी नागरिकांनी आंबेडकरांना अभिवादन केले. धानोरा येथे नागरिकांनी  सजविलेल्या रथात डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. यावेळी महिला दुचाकी वर निळ्या ध्वज घेऊन अग्रस्थानी होत्या.

कडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर dr babasaheb ambedkar jayanti  यांच्या अर्धकृती पुतळ्यासमोर फुलांची सजावट करण्यात आली. नागरिकांनी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील नाथ, ठकाराम दुधावडे, दीपक गरुड यांच्यासह नागरिकांनी अभिवादन केले. बीड जिल्ह्यातील गावागावात आणि शाळा महाविद्यालये, शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.