आष्टी
amalner ashti ahmednagar railway अमळनेर आष्टी अहमदनगर रेल्वे मार्गाला उद्या प्रारंभ होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे सूर करणार आहेत. अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
23 डिसेंबर 2023 ला न्यू आष्टी येथून अहमदनगर रेल्वेची सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अमळनेर पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने नगर अमळनेर पर्यंत ही रेल्वे धावणार आहे.
दरम्यान नगर येथे रेल्वेला आग लागण्याने नगर न्यू आष्टी ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. मागील वर्षी या उद्घाटनासाठी राज्यमंत्री रावसाहेब दानवे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या हस्ते झाले होते.
nagar ashti railway latest news
नारायणडोह-सोलापूरवाडी-लोणी-धानोरा-कडा व आष्टी रेल्वे स्थानके पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आष्टी ते अमळनेर पर्यंत चे सर्व लहान मोठे पूल आणि रेल्वे रूळ यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता अमळनेर भागातील नागरिकांना अहमदनगर येथे जाण्यासाठी आणि त्याच बरोबर पुणे मुंबई येथे संपर्क होणार आहे.