यशाच्या शिखराला गवसणी घालणाऱ्या अलका पवार

- Advertisement -
- Advertisement -

अकोले , ता . ७: जिद्द , चिकाटी , आत्मविश्वास या त्रिसूत्रीवर दहावी झालेल्या अलका पवार विमा व्यवसायात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्या.

अलका पवार

अलका पवार यांचे बालपण अकोले तालुक्यातील मोग्रस गावी १९७६ साली  जन्म, घरची बेताची परिस्थिती  इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी शाळेला सुट्टी लागली कि मोग्रासला आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी शेतीत नांगर धरणे बैलगाडीतून शेतीमाल घरी नेने , दोन वेळेस गाईचे दूध काढणे ते दूध संकलन केंद्राला नेने . अशी कामे त्या करत , दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा विवाह कोतुळ येथील कोंडीबा पवार यांचे सोबत झाला ते अगस्ती सहकारी साखर कारखान्यात सेवेत होते . त्याच्या पगारात खर्च भागात नसल्याने त्यांनी शिवणकाम सुरु केले . शिवणकाम करतात करता यशवंतराव मुक्त विधापीठातून एम . ए , पॉलिटिक्स केले . २००४ साली पाटील कारखान्याने ब्रेक दिला . उत्पनाचे साधन बंद झाले त्यात शिवणकाम सतत केल्याने त्यांना पाठदुखीचा त्रास सुरु झाला . मग त्यानी पतसंस्थेची पिग्मी एजन्ट म्हणून काम सुरु केले . मात्र देव त्याची कसोटी पाहत होता त्याच्या पतीचा अपघात होऊन ते घरात वर्षभर पडून होते . मात्र जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले कामात खंड पडू न देता आलेल्या संकटाला सामोरे जात त्यानी विमा  श्रीनिवास वाणी यांची भेट घेऊन विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरु केले . आणि त्यात त्यांनी अधिक प्रगती केली .२००७ साली त्यानी विमा व्यवसायात शतकवीर बनून आर्थिक आलेख वाढविला  पतीचे वैधकीय उपचार , मुलीचे शिक्षण , घर , गाडी या सुविधा मिळविल्या मोठी मुलगी प्रियांका हि एमएस्सी बीएड , दुसरी मुलगी मनीषा बी . इ . मेकॅनिकल झाली . तर विमा व्यवसायात विश्वास संपादन केल्यामुळे अलका ताई २०१७ पासून सतत चार वर्षे एमडीआर टी (USA )हा आंतराष्ट्रीय सन्मान मिळविला व प्रत्येक स्पर्धेत त्या प्रथम येत आहेत .५००० ग्राहक त्यांनी मिळविले आहेत . वर्षाला दहा लाख रुपये त्याचे उत्प्प्न आहे .  विमा ग्राहकांना सतत मार्गदर्शन करून जुन्या कामातून नवीन काम त्या करतात त्याचे पती , मुले त्यांना या कमी मदत करतात विमाविकास अधिकारी श्रीनिवास वाणी यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने त्या अकोलेच नव्हे तर संगमनेर शाखेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवीत त्यानी यशोशिखर सर केले आहे . आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी त्यांना सलाम करावा असेच त्याचे कर्तृत्व आहे .

आणखी वाचा :श्रद्धेने 80 म्हशींचा सांभाळ करणारी युवती

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles