अहमदनगर
ahmednagar news pramod kamble अहमदनगरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे तो म्हणजे प्रमोद कांबळे साकारत असलेल्या ram mandir ayodhya राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील प्रभू राम यांच्या जीवनातील प्रसंग होय.देशातील अनेक शिल्पकारातून त्यांची निवड झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेले अयोध्येतील राम मंदीर ayodhya temple जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होत आहे. या मंदिराचं बांधकाम जोरात सुरु आहे.
या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणतील 100 प्रसंग साकारण्यात येत आहेत.अहमदनगर येथील प्रसिद्ध चित्र- शिल्पकार प्रमोद कांबळे pramod kamble यांच्या स्टुडिओत हे शिल्प साकारण्यात येत आहेत. या शिल्पकृतीमुळे अहमदनगरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे.
नगरच्या सावेडी भागातील गुलमोहर रस्त्यावर प्रसिद्ध चित्र- शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत सध्या या शिल्पांचे काम सुरु आहे. अद्वितीय शिल्पकृती हे प्रमोद कांबळे यांच्या शिल्पांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.त्यांनी आत्तापर्यंत अनेक बोलक्या शिल्पांची निर्मिती केली आहे.त्यांच्या या अद्वितीय कलाकृतीतूनच त्यांना जगप्रसिद्ध राम मंदिराच्या ram mandir news शिल्पकृती साकारण्याची संधी मिळाली आहे.त्रिमित स्वरूपात हे शिल्पे असून राम मंदिराच्या निर्माण कार्यात अहमदनगरच्या या कलाकाराच्या सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
किंग चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाचा कॉफी मग नगर मध्ये
ahmednagar news pramod kamble यांचे त्रिमिती शिल्प कसे असणार ?
sculpture चित्र आणि शिल्प अशी दोन्ही माध्यमात काम करणारे प्रमोद कांबळे यांनी आजवर अनेक शिल्पकृती तयार केले आहेत.मध्य प्रदेशातील नानाजी देशमुख उद्यानात साकारलेल्यात्यांच्या विविध प्राण्यांच्या शिल्पकृतीचे भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी विशेष कौतुक केले होते.
त्रिमितीय स्वरूपात असलेले शिल्पकृती पाहणाऱ्यांच्या नजरेत भरतात.त्यांचा गौरव नुकताच नेपाळ सरकारने लुंबिनी पीस अवॉर्ड देऊन केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना जीवन साधना पुरस्कार ने सन्मानित केले आहे.त्याचबरोबर भारतीय लष्कराचा ओन द स्पॉट कमांडेशन अवार्ड लष्कर प्रमुख मनोज कुमार पांडे यांच्या हस्ते पुणे येथील एनडीएच्या कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर प्रमोद कांबळे यांच्या शिल्पकृतींचे दर्शन देशभरातून येणाऱ्या नागरिकांना होणार आहे.या शिल्पकृती दगडाच्या बनवण्यात येणार असून मात्र त्याची प्रतिकृती ही ahmednagar news अहमदनगर मध्ये प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये साकारत आहे.
ram mandir news update, प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित 100 प्रसंगाचे दर्शन या प्रतिकृतीतून होणार आहे.यासाठी देशभरातून वेगवेगळ्या कलाकारांकडूनराम मंदिर निर्माण समितीने त्रिमितीय मॉडेल तयार करून मागविण्यात आले होते.त्यामध्ये प्रमोद कांबळे यांच्यात्रिमितीय मॉडेलची निवड झाली आणि प्रमोद कांबळे यांना या शिल्पांचे काम मिळाले.वाल्मिकी रामायणावर आधारित या शिल्पांचे रेखांकन सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी केले आहे.
त्यावर आधारित मातीची शिल्पकृती तयार करण्यात येत असून त्यातून पुढे फायबरची शिल्पे तयार केली जाणार आहेत.त्यानंतर याच शिल्पकृतींवर आधारित दगडांतून जयपूर आणि ओरिसा येथे दगडांतून ayodhya ram mandir news, शिल्प साकारली जाणार आहेत.
याबाबत ‘गोदातीर’ न्यूजशी बोलताना चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सांगितले कि,”दोन वर्षापासून या शिल्पांसाठी राम मंदिर निर्माण समिती शिल्पकारांच्या शोधात होती. या साठी त्यांनी देशातील सर्व शिल्प काम करणाऱ्या व्यक्तीना आपली कला सदर करण्याची संधी दिली. त्यासाठी एक विषय देऊन त्यावर मॉडेल तयार करण्यास सांगितले होते. देशातील जवळ जवळ 27 मॉडेल अयोध्येत आले होते. त्याचे परीक्षण समितीने केले. त्यातून त्यांनी मला फायनल मॉडेल बनविण्यास सांगितले. ते त्रिमितीय मॉडेल केल्यानंतर त्यांनी त्याचे पुन्हा दिल्लीत परीक्षण केले. त्यातून सर्व कलाकारांसोबत बैठक घेऊन हे काम फायनल करण्यात आले आहे. या साठी खूप बारकाईने काम करावे लागत आहे. त्यासाठीची चित्रे पाहून त्याप्रमाणे शिल्प तयार करावी लागत आहेत. त्यासाठी भिंतीच्या साह्याने प्रमाणित आकारात ह्या मातीकाम करून त्यांना आकार देण्याचे काम करावे लागत आहे. यामध्ये २६ फुट लांबी पर्यंतची पनेल चा समावेश आहे”.
सुरुवातीला चित्रांच्या निरीक्षणातून ओबड धोबड मातीचे शिल्प बांधणी केली जाते. त्यानंतर त्यांना आकार दिला जात आहे. या मातीचे शिल्प तयार झाल्यावर त्यातून उत्तम दर्जाच्या फायबरचे मोल्ड तयार केले जाणार आहे. आणि त्यावरून अंतिम दगडाचे शिल्प साकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये रामायणातील रामाचे पायसदान, जन्म प्रसंग आनंद उत्सव नारद मुनी आणि वाल्मिकी यांची रामायणावरील चर्चा ram mandir news today, राम दरबार चित्रकूट असे वेगवेगळे प्रसंग यामधून साकारले जाणार आहे.
ahmednagar news todayअहमदनगर मध्ये प्रसिद्ध राम मंदिराच्या शिल्पांची निर्मिती होणे हे नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.