अहिल्यानगर
ahilyanagar district sports purskar क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, कार्यकर्ता, संघटक यांना दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये दहा हजार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदी उपस्थित होते.
सन २०१९-२०२० या वर्षासाठी गुणवंत क्रीडा कार्यकर्ता /संघटक पुरस्कार श्री.दिनेश लक्ष्मण भालेराव. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार डेविड सुरेश मकासरे. गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार सोमनाथ सपकाळ. गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार अपूर्वा गोरे. गुणवंत खेळाडू पुरस्कार दिव्यांग सुहास मोरे. गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार फिजा सय्यद यांना प्रदान करण्यात आले.
अहिल्यानगर न्यूज :महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
सन २०२०-२१ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजय मस्के. गुणवंत खेळाडू पुरुष किरण गहाणडुले. गुणवंत खेळाडू महिला वैष्णवी गोडळकर
सन २०२१-२०२२ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक विजय देशमुख. गुणवंत खेळाडू पुरुष श्रीनिवास कराळे. गुणवंत खेळाडू महिला विश्वेशा मिस्कीन.
सन २०२२-२३ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्रीराम सेतू आवारी. गुणवंत खेळाडू पुरुष ओम करांडे. गुणवंत खेळाडू महिला कोमल वाकळे.
सन २०२३-२०२४ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मण उदमले. गुणवंत खेळाडू पुरुष ओंकार सुरग.गुणवंत खेळाडू महिला योगिता खेडकर व गुणवंत खेळाडू पुरुष विशेष पुरस्कार शंकर गदाई यांना प्रदान करण्यात आला.