अहिल्या नगर
Ahilyanagar crime news महिलेने आपल्या तीन साथीदारांसोबत संगणमत करून आपल्या आपल्या प्रियकराला ब्लॅकमेल करून एक लाख रुपये घेतल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली.
फिर्यादी सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर, रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर व त्यांची मैत्रीण असे एमआयडीसी परिसरात असताना 3 अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीस मारहाण करून एक लाख रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.तसेच फिर्यादीचे व त्यांचे मैत्रिणीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, पैशाची मागणी केली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संदीप पवार, सुरेश माळी, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमुन गुन्ह्यातील अनोळखी निष्पन्न करून, आरोपीचा शोध घेवुन मिळुन आल्यास तात्काळ ताब्यात घेणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा मयुर ढोले, रा.बीड याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयीत इसमांचा बीड शहरामध्ये शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) मयुर मधुकर ढोले, वय 27, रा.सुयोग अपार्टमेंट, शिवाजीनगर, बीड 2) अभिजीत शंकर गलधर, वय 27, रा.सिध्देश्वर, एमआयडीसी बीड 3) नितीन स्वामी डांगरे, वय 26, रा.बुरूडगल्ली, हिरालाल चौक, बीड असे असल्याचे सांगीतले.
पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन, विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा 4) प्रियंका पांडुरंग ढलपे, रा.बीड (फरार) हिचे मदतीने केल्याची माहिती सांगीतली.आरोपी मयुर मधुकर ढोले याने सांगीतले की, त्याची मैत्रीण प्रियंका पांडुरंग ढलपे, रा.बीड ही सध्या विळदघाट परिसरात नोकरीस आहे.तिचे नोकरीच्या ठिकाणी असलेले सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर, रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर यांचेशी तिचीचार – पाच महिन्यापासुन ओळख असून सुरेंद्र पिंपरकर यास प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यास फसवणुक त्याचेकडून पैसे काढायचे असे ठरले.
त्यानुसार प्रियंका पांडुरंग ढलपे ही दिनांक 24/01/2025 रोजी सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर यास नाथकृपा ट्रान्सपोर्ट, एमआयडीसीच्या पटांगणात घेऊन गेली त्यावेळी आरोपी हे लाल रंगाचल आय टेन कार क्रमांक एमएच-02-बीटी-7423 मधुन नमूद ठिकाणी गेले.आरोपीतांनी दोघांचे फोटो व व्हिडीओ काढुन फिर्यादीस व्हीडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, मारहाण केली.आरोपीतांनी बळजबरीने फिर्यादीचे मोबाईल फोन पे वरून मयुर मधुकर ढोले याचे मित्राचे फोन पे वर एक लाख रूपये ट्रान्सफर करून घेतले असल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, . संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.