बीड
Ahilyanagar beed parli inspection अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग पूर्णत्वाकडे जात आहे.आतापर्यंत अहिल्यानगर ते विघणवाडी पर्यंत रेल्वे चे टेस्टिंग पूर्ण झाले आहे. आता त्यापुढे राजुरीपर्यंत आणि बीड पर्यंत चे रेल्वेचे काम पूर्ण झाले आहे. त्या कामाची पाहणी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे येत आहेत.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे ३ ते ६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पुणे विभागातील विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तेथील सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. खा.बजरंग सोनवणे हे लोकसभेचा निकाल लागल्याच्या पहिल्या दिवसांपासून रेल्वेला गती देण्यासाठी केंद्रस्तरावर पाठवुरावा करत आहेत.
या दौऱ्यादरम्यान महत्त्वाचे टप्पे ठरवण्यात आले असून यात, दि.४ फेब्रुवारी २०२५: विगनवाडी ते राजुरी स्थानकांदरम्यानची तपासणी, ५ फेब्रुवारी २०२५: राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी, ६ फेब्रुवारी २०२५ बीड येथून तपासणी पूर्ण करून सकाळी ७ वाजता सीएसएमटी येथे आगमन होणार आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून बीड जिल्ह्यासाठी रेल्वे सुविधांच्या विकासाची मागणी केली आहे. या निरीक्षण दौऱ्यादरम्यान बीड स्थानकाच्या विकासासंदर्भात आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम रेल्वे सुविधा मिळाव्यात, यासाठी खा.सोनवणे सातत्याने प्रयत्नशील आहेत.