बीड
Agniveer bharti last date अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष 2025-2026 साठी होणाऱ्या अग्नीवीर भरतीसाठी अविवाहित पुरुष, अविवाहित महिला उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची तारीख 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 आहे.
सामान्य प्रवेश परीक्षा संभवतः जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात येईल. हे भरती अर्ज आहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार 12 मार्च 10 एप्रिल 2025 पर्यंत भरू शकतात. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन दिनांक 10 एप्रिल 2025 पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन कर्नल शरद पांढरे (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बीड यांनी केले आहे.