नगर,
Acb trap in pravaranagar राज्याचे महसूलमंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपाला वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी मापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड याने 12 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
यासंदर्भात पंपाचे मॅनेजर यांनी नगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून विभागाने श्रीरामपूर वजन मापे कार्यालय चे अशोक श्रीपती गायकवाड, वय 52 वर्ष, वजन मापे निरीक्षक वर्ग-2,नेमणूक-वजन मापे कार्यालय, श्रीरामपूर, जि. अहमदनगर रा- जिजामाता चौक, स्टेट बँकेजवळ श्रीरामपूर, जि. अहमदनगर याला <राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था, प्रवरानगर च्या पेट्रोल पंपावर लाच घेताना रंगेहात पकडले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आणखी वाचा :11 फेब्रुवारी रोजी बीड येथे धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मोर्चाचे आयोजन