अहिल्या नगर
Ahilyanagar zero rainfall राज्यात सर्वदूर पाऊस पडत असताना मात्र अहिल्या नगर जिल्ह्यातील बोधेगाव महसुली मंडळात 0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजला असताना मात्र राज्यातील या महसुली मंडळात शून्य पाऊस झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात काल तीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत तालुक्यातील वालवड मंडळात आणि कर्जत मंडळात झाली.
या मंडळात अनुक्रमे 76.5 इतकी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस शेवगाव तालुक्यातील बोधेगाव महसुली मंडळात 0 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळामध्ये 60 पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
नागापूर 68 पारनेर ७२.३ मिलिमीटर श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा 63.5 मिलिमीटर लोणी व्यंकनाथ 63.5 मीटर कर्जत 76.5 मिमी माही 62.3 मिमी वालवड ७६.५ खर्डा 63.8 मिमी वाकडी 68 मिमी या महसुली मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस पडला.
प्रत्येक तालुका निहाय पावसाची आकडेवारी
नगर 36 मिलिमीटर
पारनेर 41.2 मिमी
श्रीगोंदा 42.9 मिलीमीटर
कर्जत 47 पॉईंट आठ
जामखेड 47.7 मिमी
शेवगाव १२.९ मिलिमीटर
पाथर्डी 13.3 मिलिमीटर
नेवासा 27.3 मिमी
राहुरी 38.8 मिमी
संगमनेर 19.1 मिलिमीटर
अकोले 16.9 मिमी
कोपरगाव 5.7
श्रीरामपूर 25.1 मिलिमीटर
राहता 34.1 मिलिमीटर