गेवराई बीड महामार्गावर भीषण अपघात 6 जण ठार

गेवराई ,


Gevrai beed highway accident 6 dies महामार्गाच्या दुभाजकात अडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने सात तरुणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत गेवराई शहरातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून येत होते.

हा अपघात गेवराई पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गढीच्या उड्डाणपूलावर रविवारी रात्री उशिरा घडला. या अपघातामुळे गेवराईत सर्वत्र शोककळा पसरली आहे.

रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांची एक्स यू व्ही वाहन दुभाजकावर आदळून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात मात्र कुणीही जखमी झाले नव्हते.

दुभाजकात अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी आले होते. यानंतर दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली.

या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माहिती मिळताच गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


घटनास्थळासह उपजिल्हा रुग्णालयात धाव
गढीच्या उड्डाणपूलावर अपघात घडल्याची माहिती मिळतात घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली होती. मात्र सहा तरुण जागीच मृत्यूमुखी पडल्याने त्यांना मदतकार्य करता आले नाही. यानंतर सहा जणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर याठिकाणी देखील शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सर्वचजण या दुर्दैवी घटनेविषयी हळहळ व्यक्त करत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles