सिंधू जल करार indus river water treaty paused update भारत आणि पाकिस्तान या दोन देशातून वाहणारी सिंधू नदी ही सर्वात मोठी नदी आहे. मानसरोवर लडाख येथून उगम पावणारी सिंधू नदी जम्मू काश्मीर मधून वाहत पुढे पाकिस्तान मध्ये जाते.तेथून पुढे संपूर्ण पाकिस्तान ओलांडून नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते.
या नदीचे पाणी वापरण्यासाठी सन 1960 मध्ये अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संमतीने करार करण्यात आला. त्याला सिंधू जल करार ( indus water treaty) असे म्हटले जाते.
सिंधू नदीला वेगवेगळ्या उपनद्या आहेत.वेगवेगळ्या उपनद्यांमुळे ही सिंधू नदी प्रचंड मोठ्या खोऱ्यात विस्तारलेली आहे.झंकार, शिंगार ,अस्तोर , झेलम, चिनाब रावी, बियास म्हणजेच व्यास नदी या सगळ्या सिंधूच्या उपनद्या आहेत.
सिंधू नदीची लांबी आहे 3200 किलोमीटर असून या नदीचं एकूण क्षेत्र आहे तब्बल अकरा पूर्णांक दोन लाख किलोमीटर. यातलं 47% क्षेत्र पाकिस्तानात आहे 39 टक्के भारतात ,8% चीनमध्ये आणि अफगाणिस्तानात 6% क्षेत्र आहे .
चिनाब आणि झेलम या सिंधू नदीच्या उपनद्या देखील जम्मू काश्मीर वाहून पाकिस्तानात येतात तर रावी बियास आणि सतलज या तीन उपनद्या देखील पंजाबातून पुढे पाकिस्तान मध्ये जातात.
कोणत्या नदीचे पाणी कोणत्या देशाचे हे ठरवण्यासाठी जो करार करण्यात आला त्याचं नाव सिंधू जल करार म्हणजेच इंडस वॉटर ट्रीटी.
भारताची फाळणी होण्याआधीच पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये पाणी वाटपाचे भांडण सुरू झालं होतं .1947 साली ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी भारत आणि पाकिस्तानच्या भौगोलिक सीमा ठरवण्यात आल्या. सिंधू नदीच्या प्रवाहाचा देखील दोन भागांमध्ये विभाजन झालं.
पाकिस्तान होता सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या बाजूला तर भारत सिंधू नदीच्या खोऱ्याच्या वरच्या बाजूला,दोन्ही देशांना सिंचनासाठी या नदीची गरज होती आणि म्हणूनच पाणी समान वितरणाचा आग्रह देण्यात आलेला होता आणि वाटपावरून indus water dispute वाद झाला.
जवळपास दशकभराच्या बैठकांनंतर एकूण 19 सप्टेंबर 1960 ला भारताचे तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे फीड मार्शल मोहम्मद अयुब खान यांनी कराची मध्ये indus water treaty 1960 सिंधू जल करारावरती सह्या केल्या.
या indus basin treaty कराराद्वारे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच पूर्व आणि पश्चिम नद्यांमध्ये विभाजन करण्यात आलं . रावी ,बियास ,म्हणजे व्यास सतलज या झाल्या पूर्व नद्या तर झेलम, चिनाब सिंधू या पश्चिमेकडच्या नद्या ठरवण्यात आल्या.
या करारानुसार पूर्वेकडच्या नद्यांचा पाणी काही अपवाद सोडले तर भारत कोणत्याही बंधनांशिवाय वापरू शकतो तर पश्चिमेकडच्या नद्यांचा पाणी पाकिस्तानने घ्यायचं असं ठरलं .
पण त्यातल्या काही नद्यांचा पाणी ठराविक प्रमाणात वापरण्याचा अधिकार भारताला देण्यात आला .त्यामध्ये वीज निर्मिती शेतीसाठी पाणी वापरण्याचे उभा देण्यात आली. indus water treaty pakistan या करारानुसार एका सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली. यामध्ये दोन्ही देशांचे आयुक्त ठराविक काळानंतर एकमेकांना भेटतील आणि समस्यांवरती चर्चा करतील असे देखील ठरलं.
कारण दोन्ही देशांमधली युद्ध मतभेद आणि वादान नंतर देखील हा नदी वाटपा बद्दलचा करार कायम होता .सलाल बाब्लिहार प्रकल्प , किशन गंगा प्रकल्प यावरून दोन देशात वाद झाले होते पण त्यावर तोडगा काढण्यात आला होता .या पाणी वाटप करारावरती पुन्हा चर्चा करण्यात यावी यासाठी 2024 साली भारताने पाकिस्तानला अधिकृत नोटीस देखील पाठवली होती .
पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला indus waters treaty आपण स्थगिती देत असल्याचा जाहीर केले. धरणांची रचना बंधारे पाणी साठवण्यासाठीचे प्रकल्प याद्वारे जर भारताने पाकिस्तानात राहणारा प्रवाह कमी केला तर त्याचा परिणाम पाकिस्तानच्या एकूणच पाणीपुरवठ्यावरती होईल .
सॉफ्टबॉल ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुमन स्पर्धेसाठी रुपाली बाळू कोडांरची निवड
कधी करता येईल म्हणजे गाळ वाहून जाण्यासाठी वेगाने पाणी कधी सोडून देता येईल आणि मग रिकामा झालेल्या तलाव नद्यांमधलं पाणी वापरून पुन्हा कधी भरता येईल. यासाठी एक विशिष्ट कालावधी ठरवण्यात आलाय म्हणजे ऑगस्ट महिन्यात मान्सूनच्या काळ सुरू असताना किशन करण्यासाठी तलाव भारताला भरता येतात पण पाणी वाटपाचा करार आल्यानंतर भारताने लडाखमध्ये नवीन जल ऊर्जा प्रकल्पांना मान्यता दिली होती .
indus water treaty upsc या सिंधू करारानुसार भारताला पाकिस्तानला फ्लॅd डेटा म्हणजे नद्यांची पूर विषयक माहिती देखील द्यावी लागते ही माहिती देण्यात आली नाही तर पावसाळ्यामध्ये पाकिस्तानला याचा फटका बसू शकतो पण इंडस वॉटर ट्रीटी ही वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक नाणेनिधीच्या मध्यस्थीनी करण्यात आली होती त्यामुळे पाकिस्तान याबद्दल त्यांच्याकडे किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कडे दाद मागू शकतो.