नेल्लोरे आंध्रप्रदेश या राज्यात होणाऱ्या सॉफ्टबॉल ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुमन या स्पधैसाठी- कु.रुपाली बाळू कोडांर हिची मुंबई युनिव्हसिटी टिम मधून तिची निवड झाली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरुषवाडी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ती माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी -श्री स्वामी समर्थ सेवा संस्था राजूर यांचे श्री समर्थ माध्यमिक विद्यालय मवेशी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आली.
या विद्यालयातील क्रीडा शिक्षक देशमुख एम बी ( राज्य कबड्डी पंच) यांनी तिच्यातले खेळांचे गुण हेरुन तिला कबड्डी मैदानी क्रिकेट या सारख्या खेळांना मार्गदर्शन केले तिला सतत प्रोत्साहन दिले तिचा खेळाचां पाया समर्थ मवेशी विद्यालयात घडला गेला.
पुढील शैक्षणिक वाटचाल मुंबईच्या कल्यानच्या उच्च माध्यमिक तसेच सिनिअर कॉलेज सायन्स या शाखेतून तिने सायन्स गॅज्युशन पूर्ण केले तसेच एम एस सी चे शिक्षण घेत असतांना ती रोज कॉलेज मध्ये खेळाचा सराव करीत असे तिचे कॉलेजचे क्रीडा शिक्षक बागेराव सर- चितांमनी पाटील सर संतोष पाठक यांनी ही खेळासाठी प्रोत्साहन दिले.
तिच्या या यशा पाठीमागे आई वडील भाऊ यांचाही खूप मोठा वाटा आहे
कु . रुपाली कोंडार हे यश पाहून स्वामी समर्थ सेवा संस्थेचे सचिव शांतारामजी काळे साहेब संस्थेचे पदाधिकारी तसेच समर्थ मवेशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका काळे मंजुषा मॅडम माजी मुख्याध्यापक विलास जी महाले सर पुरुष वाडी गांव तसेच मवेशी गावंचे ग्रामस्थ यांनी तिच्या या यशाचे कौतुक केले तिला पुढील होणाऱ्या स्पधैसाठी शुभेच्छा दिल्या.