marathi actor sagar karande cheated by women worth 61 lakh ऑनलाईन फ्रौड च्या गोष्टी सर्वत्र बोलल्या जातात मात्र त्यातून धडे घेताना कोणी दिसत नाही. या आभासी दुनियेतील मोहापायी अनेक नागरिक आपले पैसे गमावून बसतात. याला आता sagar karande comedyअभिनेतेही अपवाद नाहीत . तेही माणसेच आहेत .
मराठी चला हवा येऊ द्या chala hawa yeu dya cast मधील विनोदी अभिनेता सागर कारंडे याची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. अर्थात तो या बाबत काहीही बोलायला तयार नाही . मात्र त्याची फसवणूक झाली हे नक्की !
नेमके काय झाले सागर कारंडे सोबत ? याची बातमीही मोठी रंजक आहे . या अभिनेत्याची तब्बल ६१.८३ लाखांना गंडा घातल्याचे वृत्त आहे. असे वृत्त होते की, फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडेला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअपवर एका महिलेचा मेसेज आला, संबंधित मेसेजमध्ये आलेल्या टेलिग्राम, इन्स्टाग्रामसह इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील लिंक लाइक करण्याचे त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलेले. प्रत्येक लाइकसाठी १५० रुपये मिळतील असा तो मेसेज होता. घरबसल्या पैसे कमावणे महागात पडल्याचे हे वृत्त सागरने फेटाळले असून त्याची उलट प्रतिक्रिया समोर आली.
Sagar Karande Cheated of Rs 61 Lakh
याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सागरने म्हटले की, ‘सागर कारंडे नावाचा मी काही एकटा नाही, खूप आहेत. गुगलवर सर्च केलं तर खूप sagar karande news सागर कारंडे सापडतील.’ माध्यमांशी बोलताना सागरने अशी प्रतिक्रिया दिली.
ऑनलाइन फ्रॉड दरदिवशी उघडकीस येतात, अशावेळी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. या कथित प्रकरणात असे समोर आलेले की, सोशल मीडियावर पोस्ट लाइक करण्यासाठी त्याच्याकडून ६१ लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिसांमध्ये (उत्तर विभाग) ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मीडिया रिपोर्टनुसार, सागर कारंडे नावाच्या व्यक्तीला आलेल्या मेसेजमध्ये संबंधित महिलेने टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामच्या काही लिंक पाठवल्या होत्या. त्या लिंक लाइक करुन प्रत्येक लाइकचे १५० रुपये मिळतील आणि त्यातून घरबसल्या ६० हजार कमावती येतील असे आमिष दाखवण्यात आले. सागरचा विश्वास संपादन करण्यासाठी या भामट्यांकडून त्याला ११ हजार रुपये देण्यात आले आणि त्यामुळे त्याने हे काम सुरू ठेवले.
हेही वाचा : मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला
हळूहळू त्याला यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यात भाग पाडले गेले. सागरने सुरुवातीला २७ लाख भरले आणि त्याचे काम सुरू ठेवले. त्यानंतर त्याने वॉलेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला असे सांगण्यात आले की काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढता येतील.
सागरला पुढे असे सांगण्यात आले की, त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि पैसे काढण्यासाठी १०० टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानुसार त्याने १९ लाख रुपये आणि ३० टक्के कर भरला. एकूण त्याच्याकडून ६१ लाखांहून अधिक रक्कम या भामट्यांनी उकळली. घरबसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाने त्याच्या हाती काहीच लागले नाही. उलट त्याने भरलेला कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगून अधिक पैसे मागितले जात होते. सागरला संशय आल्यावर त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
पहा न आहे ना कमाल ? तुम्ही फसू शकता ,अशा फसव्या लिंक्स आणि भूल थापांना बळी पडू नका .