नांदेड
Nanded alegaon accident tractor fell into well 7 women died शेतमजुरीसाठी वसमत तालुक्यातील गुंज येथून नांदेड तालुक्यात आलेगाव शिवारात येत असलेल्या शेतमजुरांचे ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची केली मदतीची घोषणा
या घटनेत दोन महिला आणि एका पुरुषाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात गुंज येथील ताराबाई सटवाजी जाधव वय ३५, धुरपता सटवाजी जाधव वय १८, सिमरन संतोष कांबळे वय १८, सरस्वती लखन भुरळ वय २५, चौत्राबाई माधव पारधे वय ४५, सपना उर्फ मीना राजू राऊत वय २५ आणि ज्योती इरबाजी सरोदे वय ३० या सात महिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली आहे
या अपघातातून पार्वतीबाई रामा भुरळ वय ३५, पुरभाबाई संतोष कांबळे वय ४० या दोन महिलांना आणि सटवाजी जाधव वय ५५ या एका पुरुषास विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
जवळपास पाच ते सहा तास हे बचाव कार्य चालले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नांदेडचे तहसीलदार संजय वरकड, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक, नांदेड महापालिकेचे अग्निशमन दल या बचाव कार्यात सहभागी झाले होते.