aadhaar registration and updation yojna महाराष्ट्रातील आधार नोंदणी केंद्रांमार्फत आतापर्यंत १२.८ कोटी आधार नोंदणी आधार नोंदणी पूर्ण केल्या आहेत. ०-५ वयोगटातील ३९% बालकांची आधार नोंदणी व ५-१७ वयोगटातील १.०६ कोटींचे बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असून, या प्रक्रियेला गती देण्यासाठी आधार केंद्र चालकांना प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये आधार नोंदणी आणि संबंधित सेवा अधिक सुलभ व व्यापक करण्याच्या उद्देशाने, दिनांक १ एप्रिल ते ३० जून २०२५ या कालावधीत प्रोत्साहन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक महसूल विभागातील आधार केंद्र चालकांच्या कामगिरीच्या आधारावर, पहिल्या तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे ₹१,००,०००, ₹५०,००० आणि ₹३०,००० इतकी बक्षिसे देण्यात येणार आहेत.