बुलडाणा
Buldana triple accident 6 dies जिल्ह्यातील खामगाव शहरालगत असलेल्या शेगाव रोडवर आज २ एप्रिल च्या पहाटे पाच वाजता जयपुर लांडे फाट्यानेजीक खाजगी बस एक महामंडळाची बस आणि बोलेरो गाडी अशा तिहेरी वाहनाच्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर विविध वाहनातील २६ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
शेगाव वरून खामगाव कडे एका खाजगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बोलेरो गाडी ला समोरून पुणे कडून शेगाव कडे येणाऱ्या महामंडळाच्या बसची धडक लागली त्यात मागून ही खाजगी बस त्या बोलेरो ला धडकल्याने तिहेरी अपघातामध्ये बोलेरो गाडीतील ५जण तर महामंडळाच्या बसमधील १ महिला प्रवासी जागीच ठार झाली.
या घटनेनंतर अपघातातील मृतक आणि जखमींना खामगाव चे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होत असून या अपघातानंतर हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होता. खामगाव पोलिसांनी तातडीने विविध यंत्रणांच्या सहाय्याने हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला