Home ताज्या बातम्या शिबिरार्थी गिरवताहेत मुजरा, गवळण, लावणी नृत्याचे धडे

शिबिरार्थी गिरवताहेत मुजरा, गवळण, लावणी नृत्याचे धडे

0
35
lavani training in ahilyanagar


अहिल्यानगर (प्रतिनिधी) :-

lavani training in ahilyanagar महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात शनिवार दि. १५ मार्च पासून सुरू झालेल्या लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक लावणी, गण, गवळण, मुजरा अशा नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण घेत आहेत. 


संगीत अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी हे विद्यार्थ्यांना ढोलकी वादनाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करीत आहेत. या शिबिरात अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत आणि मोठ्या उत्सुकतेने लावणी नृत्य व ढोलकी वादन, हार्मोनियम वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. ज्येष्ठ हार्मोनियम वादक लक्ष्मण भालेराव हे हार्मोनियम वर संगीत साथ देत आहेत.

Bhoomi online certification of Maharashtra भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला असा करा ऑनलाईन अर्ज


या प्रशिक्षण शिबिरामध्ये लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर या शिबिरार्थी विद्यार्थिनींना घुंगरू कसे बांधायचे, लावणीसाठी आवश्यक असणारी रंगभूषा, वेशभूषा, पदन्यास, पारंपारिक लावणीचे प्रकार, जुन्या जाणत्या लोकप्रिय लावणी कलावंतांच्या कलाकारकिर्दी बद्दलची माहिती देत आहेत.

त्याचबरोबर त्यांच्याकडून वेगवेगळ्या पारंपारिक लावण्या बसवून घेत आहेत. या लावणी प्रशिक्षण शिबिरासाठी लावणी व लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. शाहीर शेषराव पठाडे, तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर आदी मान्यवरांनी लावणी, गण, गवळण, बतावणी या विषयावर मार्गदर्शन केले आहे.


दि. १५ मार्च ते २५ मार्च या १० दिवसाच्या कालावधीत हे लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिर होत आहे. लोककला अभ्यासक भगवान राऊत हे या शिबिराचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here