उजनीतून मिळणार आष्टी तालुक्याला पाणी;आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उजनीतून मिळणार आष्टी तालुक्याला पाणी;आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


आष्टी (प्रतिनिधी)


Ujni khuntephal pipeline project ashti आष्टी तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळाने शेतकरी शेतमजूर यांच्या हालअपेष्टा अनुभवलेल्या आ.सुरेश धस यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवातच या कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्यासाठी कायमस्वरूपी सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या ध्येयाने राजकारणात उतरलेल्या आ.सुरेश धस यांनी खुंटेफळ साठवण तलाव पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवून अथक परिश्रम केले असल्याने त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांना यश आले असून आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते थेट जलवाहिनी कामाच्या बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील खा. बजरंग सोनवणे, आ.प्रकाश सोळंके आ.नमिता मुंदडा आ.संदीप क्षीरसागर आ.विजयसिंह पंडित पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित राहणार आहेत .

खुंटेफळ साठवण तलावाची मंजुरी सन 20 14 मध्ये मिळाली परंतु मधल्या कालावधीमध्ये पर्यावरणाची परवानगी न मिळाल्यामुळे तलावाचे काम बंद होते. परंतु सन 2018 मध्य सुरेश धस विधान परिषद सदस्य झाले आणि या कामाला पुन्हा गती मिळाली त्यांनी तत्कालीन खा.प्रीतम मुंडे यांचे बरोबरीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळवली आणि या रखडलेल्या कामाला संजीवनी मिळाली आणि काम सुरू झाले.

परंतु खुंटेफळ साठवण तलावामध्ये भूसंपादित झालेल्या गावांचे पुनर्वसन आणि इतर काहीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर सुरेश धस 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर या कामाने भरारी घेतली असून नोव्हेंबर 2024 पासून आजवर 20 टक्के पेक्षा ज्यादा काम झाले असून आमदार सुरेश धस यांची कामाची धडाडी आणि पाठपुरावा आणि या तलावाच्या बारीक-सारीक तांत्रिक माहिती असल्यामुळे या तलावाच्या कामाने गती घेतल्या असून शासनाने देखील पुरेसा निधी उपलब्ध करून दिला.

मध्यंतरी झालेल्या विधानमंडळ अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रकमे 300 कोटी रुपये या तलावाच्या कामासाठी निधी मंजूर करून या तलावाच्या पूर्णत्वाविषयी संकेत दिलेले आहेत.

आ.सुरेश धस यांनी त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प असून त्यांनी या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न केल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या कार्यक्रमासाठी येत आहेत.

कृष्णा खोरे अंतर्गत असलेल्या या कृष्णा मराठवाडा योजनेअंतर्गत असलेल्या आष्टी सिंचन योजना क्रमांक तीन म्हणजे खुंटेफळ साठवण तलाव हा असून एकूण 1.68 टीएमसी पाणी आणि मराठवाड्याच्या हक्काचे संभाव्य चार टीएमसी पाणी येईल उपलब्ध होणार हे गृहीत धरून तलावाचे काम सुरू असून 2801 कोटी रुपये किंमत असून 26 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून त्याद्वारे 20 हजार एकर शेतीला पाणी मिळणार आहे.

आणखी 4 टीएमसी पाणी मंजूर झाल्यास त्या खुंटेफळं साठवण तलावातून आष्टी तालुक्यातील इतर तलावांमध्ये हे पाणी वितरित करण्यात येणार असल्यामुळे संपूर्ण आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले असून आमदार सुरेश धस यांच्या या भगीरथ प्रयत्नामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुमारे एक लक्ष जनसमुदाय उपस्थित राहणार असून त्यासाठी 65 हजार खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.

महिला वर्गांनी देखील या कार्यक्रमासाठी यावे याचे नियोजन करण्यात आले आहे या भव्य दिव्य अशा या नियोजनामुळे हा कार्यक्रम यशस्वी होईल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles