बीड
Beed police action नुतन पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस अधीक्षक बीड पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.आतापर्यंत 63 अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली.
कार्यभार स्विकारल्यापासुन अधिपत्त्याखालील सर्व आधिकाऱ्याचे मॅरेथॉन बैठका घेवुन, अधिपत्त्याखालील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करुन बीड जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाट्न करण्या बाबत कठोर सुचना दिल्या .
बीड जिल्हयातील एकुण 28 पोलीस ठाणे अंतर्गत जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकुण 34 ईसमांवर जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये एकुण 27 गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण 87,440 रु. (सत्याऐंशी हजार चारशे चाळीस) रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच जिल्हयातील अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी अवैध दारु ठिकाणावर जिल्हयातील 28 पोलीस ठाणे अंतर्गत एकुण 36 ईसमांवर मुंबई दारुबंदी अधिनियम अंतर्गत 36 गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्यामध्ये एकुण 2,50,055 (दोन लाख पन्नास हजार पंचावन्न) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बीड शहरामध्ये सिगारेट व अन्य तंबाखु जन्य उत्पादने जाहिरात, मनाई आणि व्यापार व वाणिज्य आणि वितरण नियम कायदयाप्रमाणे दोन गुन्हे दाखल करुन 1755 (सतराशे पंचावन्न) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्हयात शहर वाहतुक शाखेमार्फत मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत 186 केसेस करुन 1,50,400/- (एक लाख पंन्नास हजार चारशे) रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे.