डूबे अपहरण प्रकरणातील आरोपींसह मुद्देमाल जप्त

- Advertisement -
- Advertisement -

बीड

Parli dube kidnap case update डूबे अपहरण प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

त्यांच्याकडून पळवलेले 10 तोळे सोन्याचे बिस्कीट, नगदी 112,000 हजार रुपये केले हस्तगत, गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी आणि एक गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे,

परळी येथील डूबे अपहरण प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, विशेष म्हणजे पळवलेले 10 तोळे सोन्याचे बिस्कीट, नगदी 1लाख 12 हजार रुपये ही जप्त करण्यात आले आहेत, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी आणि एक गावठी कट्टाही केला जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे परळी शहर गुरनं. 192/2024 कलम 126(2), 140 (2),308(3),(4)(5), 351(2), (3),3 (5) बी.एन.एस. सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील फिर्यादी नामे अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी वै.ता. परळी जि.बीड, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 09/12/2024 रोजी रात्री 09.00 ते 11.30 वा. दरम्यान अनोळखी पाच ईसमांनी तोंडाला रुमाल बांधुन येवून त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना गाडीत टाकुन जबरदस्ती घेवून जावुन बंदुकीचा धाक दाखवुन जिवे मारण्याच्या धमक्या देवुन त्यांना कारमध्ये अपहरण करुन कन्हेरवाडी घाटामध्ये घेवून जावून त्यांच्याकडून खंडणी म्हणून त्यांच्याकडे असलेली नगदी 3,88,300/- व 10 तोळे सोन्याचे बिस्कीट किंमत अंदाजे 4,00,000/- असा एकुण 8,28,300/- रुपयाचा माल घेवुन गेले आहेत.

वगैरे मजकुराचे फिर्याद वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles