आष्टी (प्रतिनिधी)
beed kaij santosh deshmukh murder case जिल्ह्यातील मस्साजोग येथील मयत सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आ.सुरेश धस यांनी बुधवारी भेट घेत बीड जिल्ह्यात कधी नव्हे अशी भीषण घटना घडली असून या घटनेमुळे केवळ केज तालुकाच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जातोय. या गुन्हेगारांच्या पाठीमागे जे कोणी आका असतील त्यांना त्यांच्या आकांनी वेळीच आवरा असे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केज येथे केले.
केज पोलीस ठाणे की, गुंडाचा अड्डा झाला असून बीडचे बिहार नाही अफगाणिस्तान मधील काबुल होईल. इराक सारखी परिस्थिती। झाली असून रोजच बॉम्ब स्फोट रोज नवीन घटना होतील. या प्रकारातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.
Bhoomi online certification of Maharashtra भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला असा करा ऑनलाईन अर्ज
आ.सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले.याप्रसंगी उपस्थित माध्यमांशी संवाद साधताना आ.धस म्हणाले की,अशा प्रकरणात तरुण मुले ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत.त्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.दरम्यान लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाचे निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत अपहरण झाल्यानंतर तीन तास गुन्हा नोंद का झाला नाही ? शिवाय यामध्ये जे कोणी पोलीस दोषी असतील त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी आ.सुरेश धस यांनी केली.
आ.सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांची घेतली भेट
मा.सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे अपहरण करुन क्रूरतेने खून करण्यात आला. या दुर्दैवी घटनेला ४ दिवस होऊन देखील देशमुख यांचे मारेकरी मोकाट फिरत आहेत.
या प्रकरणी पोलीस चौकशी वेगवान व्हावी आणि पोलीस तपास विशेष अधिकारी व पथक नेमुन अधिक माहिती घेण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची आ.सुरेश धस यांनी बीड येथे भेट घेतली. संबंधित प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.