सोलापूर , प्रतिनिधी
No evm election on ballot paper सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत चुकीच्या पध्दतीने मतदान झाल्याची शंका गावकऱ्यांनी उपस्थित केली आहे.
तसेच त्यांनी बॅलेट पेपर वरती मतदान घेण्याचा प्रयत्न केला हेाता. मात्र याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला तसेच गावकऱ्यांनावर गुन्हे दाखल करण्यात आले त्या गावात दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट चुकीची आहे.
मतदारांना शंका आहे त्या शंकेचे निरसन करणे ही शासनाची जबाबदारी असताना ही त्या ठिकाणी फेरमतदानाला विरोध केला ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे मारकडवाडीचा विषय आता देशपातळीवर पोहचला आहे.
तसेच संपूर्ण देशाचे लक्ष मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी वेधून घेतले आहे. लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हिएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज आहे.
त्यासाठी आता तालुक्यातील प्रत्येक गावाने आता बॅलेट पेपरवरतीच मतदान घेण्यासाठीचा ठराव करावा आणि तो ठराव आ उत्तम जानकर यांच्याकडे द्यावा तो आम्ही निवडणूक आयोगापर्यंत पोहच करु असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.
युरोप खंडातील अनेक देशानी आता इव्हिएम मशीनला विरोध केला आहे. अमेरिका, इंग्लड या सारख्या प्रगत देशाने ही आता ईव्हिएम मशीनला विरोध केला आहे.
त्यामुळे निवडणूक आयेागाने आता बॅलेट पेपरवरती निवडणूका घ्याव्यात यासाठीच हा ईव्हिएम विरोध जनअक्रोश करण्यात येत असल्याचे पवार यांनी जाहिरपणे सांगितले आहे. तर याबाबतीत बोलमाना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हिएममध्ये घोळ आहे.
मतदारांचे समाधान करण्यासाठी बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावे अशी आपली मागणी आहे. मात्र प्रशासनाने या फेरमतदानाला प्रखर विरोध केला आहे. त्यामुळे लोकांच्या शंकेचे निर्सन होवू शकले नाही.
त्यामुळे आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तर यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही या ईव्हिएम विरोधी जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा दिला.
तसेच यापुढे बॅलेट पेपरवरती निवडणूका घ्याव्यात यासाठी आता हे राज्यव्यापी आणि तर देशव्यापी आंदोलन उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी मारकडवाडी ग्रामस्थांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
गावकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र घेवून निवडणूक आयोगाला भेटणार : उत्तम जानकर
मारकडवाडी येथील १४०० लोकांनी जानकर यांना मतदान केले आहे. मात्र मशिनवर ८०० ते १००० मतेच दाखविण्यात आली आहेत. त्या १४०० लोकांचे प्रतिज्ञापत्र घेवून निवडणूक आयेागाला भेटणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले.
तसेच बॅलेट पेपरवती निवडणूक घेण्याची मागणी करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच जर निवडणूक आयोग बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यास तयार असतील तर मी आमदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले.
तसेच निवडणूक आयोगाने जर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची मागणी मान्य न केल्यास आपण आयेागाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जावू असा इशारा ही जानकर यांनी दिला आहे.