Ambajogai news महापरिनिर्वाण दिनानिमित्त, आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांवर चालून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समानता, न्याय आणि बंधुतेच्या मार्गावर पुढे नेत जावं, हीच खरी श्रद्धांजली.-मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर.एस.
अंबाजोगाई प्रतिनिधी
आज संकल्प विद्या मंदिर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर.एस. तर प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती कुलकर्णी मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शिंदे मॅडम यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अगदी उत्कृष्ट इंग्रजी ,हिंदी, मराठी भाषेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
आजचा दिवस सहा डिसेंबर भारतीय समाजाच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांवर चालून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समानता, न्याय आणि बंधुतेच्या मार्गावर पुढे नेत जावं, हीच खरी श्रद्धांजली. होईल असे मत मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर.एस. यांनी अध्यक्षीय समारोप करत असताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजना इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते यांना वर्ग शिक्षकास श्रीमती नायक पि. एच. यांचे मार्गदर्शन लाभले. तर उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन ,आयोजन केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व विभाग प्रमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखणी देऊन कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. श्रेयश लोमटे, कु. सानिध्या स्वामी या विद्यार्थ्यांनी केले तर आभार कु.आरोही बनाळे या विद्यार्थिनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.