मुख्यमंत्री पेक्षा गृह खात्यावर नजरा
मुंबई
Who is having Home ministry of Maharashtra मुख्यमंत्र्याचा शपथविधी काही तासावर येऊन ठेपला आहे मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप कुठलीही घोषणा नाही. याबाबत महायुतीच्या सर्वच पक्षांकडून गोपनीयता राखली जात आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यापेक्षा गृह खाते कोणाकडे असणार या प्रश्नावर सध्या खलबते सुरू आहे. त्यामुळेच किंबहुना मुख्यमंत्र्यां ची घोषणा होताना दिसत नाही.
याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री यांच्या बदल्यात शिंदे यांनी गृह मंत्री पदाची केलेली मागणी.
राज्यात कोणाचा गृहमंत्री असावा याबाबत रस्सीखेच सुरू आहे. भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी गृह मंत्री पद आपल्याकडे ठेवले होते. त्यामुळे ते आमदारांना गुवाहाटी येथे घेऊन जाण्यात यशस्वी झाले. ज्या पक्षाकडे गृहमंत्री पद असते त्या पक्षाची राज्यातील सर्वांवरच मोठी पकड असते.
त्याचा वापर करून अनेक पक्षांनी आपल्या विरोधकांना नमो हरम करण्याचा प्रयत्न केला आहे.
गृहमंत्री जर आपला असेल तर राज्यात विरोधी पक्ष नेते आमदार आणि मंत्रिमंडळावर वचक ठेवता येतो. त्यामुळेच भाजपा आपल्याकडे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहे.
राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुती सरकारला पुन्हा एकदा भरघोस बहुमत मिळाले. या घटनेला आठवडा उलटून गेला मात्र सरकार स्थापन झाले नाही. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात परतले त्यानंतर ते आपल्या मूळ गावी सातारा तालुक्यातील दरे गावात गेले. दोन दिवस शिंदे तिथे राहून मुंबईत परतले, आणि मुंबईत येऊन फक्त काही तास राहून पुन्हा दरेगावात गेले. त्यामुळे सरकार स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
सरकार स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गोपनीयता पाळली जात आहे.
त्याला कारणही तसेच आपल्याला दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई सोडून मूळ गावी जाणे हे सर्वच जाणकारांना प्रश्न निर्माण करणारे आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे जाहीर झाले,मात्र दुसरा मुख्यमंत्री कोण होणार हे गुलदस्त्यात आहे. भाजपाच्या वतीने देवेंद्र फडणवीस हे प्रोजेक्ट होताना दिसत आहे.
यापूर्वी ज्या पक्षाकडे गृहमंत्री पद नव्हते मात्र मुख्यमंत्री होते. त्यांना मुख्यमंत्री असूनही पक्षात होत असलेल्या उठावाची दुसरी कल्पनाही आली नाही. त्यामुळे शिवसेना महायुतीचे सरकार गडगडल्याचे दस्तूर खुद्द खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
त्यामुळे एकूणच मुख्यमंत्रीपदाच्या इतकेच महत्त्वाचे किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाचे असलेले गृहमंत्री पद महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला नको असेल?.