सुरेश धस यांना मत ‘दान’ पावलं!

- Advertisement -
- Advertisement -

आष्टी

ashti beed vidhansabha result दहा वर्षापासून विधानसभेच्या आमदारकी पासून दूर असलेले आष्टी सुरेश धस यांना मतदारांनी भरभरून दिलेल्या मत दान मुळे धस भरभरून पावले! अद्याप पर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारांनी इतके भरभरून ‘दान’ धस यांना दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरेश धस सत्तेत आले.

विधानसभा निवडणूक मतमोजणी आज पार पडली. या मतमोजणीत सुरेश धस यांना अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाल्याचे दिसत आहे. त्यांना एक लाख चाळीस हजार पाचशे सात इतकी मतदान पडले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अपक्ष आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आजबे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख यांच्यावर मात करत विजय मिळवला.

अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना ६२५३२, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना 21 हजार 598 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख यांना 52 हजार 738 इतकी मते मिळाली. या तिघांच्या बेरजेपेक्षाही जास्तीची मते धस यांनी मिळवली.

ashti beed vidhansabha result चौरंगी लढतीमध्ये धसांनी बाजी मारली

आष्टी पाटोदा शिरूर या तीन तालुक्यांमध्ये विभागलेल्या या मतदारसंघांमध्ये मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल वंजारी समाज आणि मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय समाजाची संख्या आहे. सुरेश धस यांच्याबरोबर बाळासाहेब आजबे हेही उमेदवारी करत असल्याने मराठा मतदानाचे विभाजन होणार असा अनेक निरीक्षकाचा अंदाज होता.

मात्र निवडून येण्याच्या निकषाला प्राधान्य देत मराठा  मतदारांनी आपले मतदान विभाजित न करता ते थेट धसांच्या पारड्यात टाकले. त्याचा धसंना फायदा झाला आणि त्यांचे मतदान वाढले. पहिल्या फेरीपासून आणि टपाली मतदानामध्ये धस यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम होती.

Solar pump for borwell -2023 बोरवेल वर सोलर लावताय मग

अन्य कोणत्याही उमेदवारांना ही आघाडी कमी करता आली नाही. याचाच अर्थ सर्वच मतदारसंघातील मराठा मतदार एकवटला आणि त्यांनी सुरेश धस यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला. निवडणुकांपूर्वी सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट यामुळेही भाजपावर नाराज झालेला समाज धस यांच्या पाठीमागे राहिला.

त्यातच काही प्रमाणात वंजारा मराठावाद निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. त्याचाच परिणाम मतांचे ध्रुवीकरण करण्यात झाला.यामध्ये सुरेश धस यशस्वी झाले.

राजकीय डाव टाकणारे म्हणूनही धसांची ओळख आहे. थेट जनतेची आणि मतदारांची नाळ जोडलेली असल्यामुळे धस यांनी निवडणुकीचे आव्हान न समजता संधी म्हणून त्यांकडे पहिले. यंत्रणा लावण्यात धस यांचा हातखंडा आहे. त्यांनी थेट लाडक्या बहिणीपर्यंत यंत्रणा उभी केली. अत्यंत सूक्ष्म नियोजन करत थेट मतदारापर्यंत पोहचण्याचे काम केले.त्याचाच फायदा त्यांना झाला. अनेक गावात त्यांनी कार्यकर्त्यावर निवडणूक सोडली होती मात्र तरीही त्यांचा अप्रत्यक्ष संपर्क होत होता.रात्र अन् दिवस फिरत त्यांनी आपल्या जनसंपर्काला उजाळा दिला, त्याचा फायदा उठवत मतदान आपल्या पारड्यात टाकून घेतले.मतदारांशी असलेला थेट संपर्क त्यांच्या कामी आला. जिल्ह्यातील भाजपाच्या दोन जागा निवडून आल्यानंतर ज्येष्ठ आणि अनुभवी म्हणून धस यांची मंत्री पदासाठी दावेदारी होऊ शकते.त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात धस यांची वर्णी लागू शकते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles