वाकून नमस्कार करणाऱ्या लोकांपासून सावध रहा!

- Advertisement -
- Advertisement -

Ashti assembly elections independent candidate ज्यांच्या मनात कपट आहे ते वाकुन नमस्कार करतात, विरोधक लबाड आहेत मतदारांनी लबाडापासून दुर रहा, अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे असा घणाघाती आरोप अपक्ष उमेदवार माजी आ. भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे केला.


दादेगाव व धामणगाव गटातील बुथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांच्या बैठकीत माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती साहेबराव म्हस्के होते.


यावेळी व्यासपीठावर उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माजी पं. स. सदस्य अमोल चौधरी, माजी सरपंच सुदाम झिंजुर्के, पं. स. सदस्य रावसाहेब लोखंडे, अरुण जाधव, वनुभाऊ जाधव, मच्छिंद्र नागरगोजे, संदीप नागरगोजे, महादेव वायभासे, हरिभाऊ तांदळे, माऊली पानसंबळ, भगवान तळेकर, सरपंच दादासाहेब जगताप, युवराज वायभासे, दिलीपराव म्हस्के, भगवान तळेकर, सय्यद शहाबुद्दीन, डॉ. गर्जे,विकी शेकडे, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पिंपळे, विष्णूपंत दहिफळे, माऊली भोसले,सरपंच अभय गर्जे, सरपंच मिसाळ,सरपंच माऊली वाघ, मयूर चव्हाण, चिंतामण गिते, राजेंद्र तांदळे, संदीप तांदळे व इतरांची उपस्थिती होती. प्रारंभी धामणगाव शहरातून भव्य अशी प्रचार फेरी काढण्यात आली ग्रामस्थांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला.


पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की, विरोधकांनी अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी माझ्यासोबत राहुन विरोधात काम करीत विश्वासघात केला. सध्या कारखाने सुरू नाहीत त्यामुळे मतदान झाल्याशिवाय ऊसतोडणीसाठी जाऊ नका. काही लोक षडयंत्र करीत कारखानावर पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेत.


लोकसभा निवडणुकीत त्यांनी आ. पंकजाताईं मुंडे यांना फसविले. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मीच मार्गी लावला आहे. विकास करणारा आणि सक्षमपणे लढणारा माणूस विधानसभेत पाठवा. मला पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी जनतेची उमेदवारी मला मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिट्टी या चिन्हांसमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, आ. पंकजाताईं मुंडे यांना मानणारे दहा अपक्ष आमदार विधानसभेवर निवडून जाणार आहेत. काही लोकांनी सर्वत्र भ्रष्टाचार केला आहे. जि. प. मध्येही मोठा भ्रष्टाचार केला होता असा आरोप केला. भाजपा पक्ष मुंडे महाजनांचा पक्ष राहिला नाही. मतदारसंघात पाहुणेरावळ्यांचे राजकारण सुरू झाले आहे. गरीब मराठा समाजाने एकत्रित येऊन भीमराव धोंडे यांना विजयी करावे.

शिट्टी समोरचे बटन दाबून भीमराव धोंडे यांना विजयी करावे. माजी पं. स. सदस्य सुदाम झिंजुर्के यांनी सांगितले की, माजी आ.भीमराव धोंडे यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. गावागावात शाळा सुरु करुन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे त्यांना विजयी करुन शिट्टीचा आवाज विधानसभेत पाठवा. युवराज वायभासे यांनी सांगितले की, सध्याची निवडणुक ही परिवर्तनाची नांदी आहे. माजी आ. भीमराव धोंडे म्हणजे शांत, संयमी व्यक्तीमत्व आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे आशीर्वाद साहेबांना आहेत त्यामुळे शिट्टी चिन्हाचा विजय निश्चित आहे.


सरपंच दादासाहेब जगताप यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात लक्ष ठेऊन काळजीपूर्वक मतदान करुन घ्यावे. मतदारसंघाचा विकास फक्त भीमराव धोंडे हेच करु शकतात. हि निवडणुक जातीपातीवर नाही असे सय्यद शहाबुद्दीन यांनी सांगितले. याप्रसंगी रामदास गर्जे, माजी उपसरपंच भगवान तळेकर, हरिभाऊ तांदळे,माऊली पानसंबळ , सय्यद शहाबुद्दीन यांची भाषणे झाली. सुत्रसंचलन तळेकर यांनी केले. कार्यक्रमास दादेगाव व धामणगाव गटातील प्रमुख कार्यकर्ते आणि बुथ प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles