आष्टी प्रतिनिधी
ashti assembly candidate bhimrao dhonde गेल्या अनेक वर्षापासून मतदार संघातील गोरगरिबांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे तरी वाढत चाललेली दहशत संपवण्यासाठी यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे मला सहकार्य करा असे आवाहन माजी आ. भीमराव धोंडे यांनी धानोरा येथे केले. पिंपळा, दौलावडगाव गट आणि धानोरा पं. स. गणातील बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते बैठकीत धानोरा येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती कुमार बांदल होते.
यावेळी व्यासपीठावर युवा नेते अजयदादा धोंडे, माजी सभापती साहेबराव म्हस्के, मुकादम मुरलीधर लगड,अभयराजे धोंडे,राजाराम ननावरे,पांडुरंग गावडे,नरहरी तागड, बाबासाहेब जाधव,रंगनाथ बोडखे, माजी सरपंच संजय कवडे, संजय धायगुडे, झुंबर चव्हाण,फारुकभाई, तुकाराम चव्हाण, बाळासाहेब शेकडे,बबन ननावरे,धुळाजी लकडे व इतर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, लोकांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे . पहिल्या टप्प्यात मी आमदार असताना मतदारसंघात एक हजार पाझर तलाव केले. रस्ते करुन ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा, महाविद्यालये सुरू केले. संस्थेत सर्व जाती धर्माचे लोक नोकरीला आहेत. मतदारसंघातील दहशत संपवण्यासाठी आपल्याला निवडणुक जिंकायचीच आहे. त्याकरीता सर्वांनी माझ्यापाठीमागे उभे रहा. लोकशाही मार्गाने दहशत संपत असते.
मागच्या निवडणुकीत मला फसविले गेले. मतदारसंघातील अनेक गावांत जल जिवन योजनेचे काम बोगस झाले आहेत. शासनाच्या पैशाचा मोठ्या अपव्यय झाला आहे. आष्टी येथे ६ तारखेला प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मतदारसंघातील पुरुष व महिलांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे ऐतिहासिक अशी सभा होणार आहे.
माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, या भागाला कुकडीचे पाणी मिळावे यासाठी माजी आ.भीमराव धोंडे हे मुंबईला पायी गेले.
लोणी गटात २०१४ पुर्वी रस्ते अत्यंत खराब होते. भीमराव धोंडे आमदार झाल्यानंतर सर्वच रस्ते चांगल्या दर्जाचे केले. त्या पाच वर्षांत मतदारसंघात
रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.
धानोरा गावांतून खऱ्या अर्थाने मा. आ.भीमराव धोंडे यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मला जि.प. निवडणुकीत फसविले, साहेबांना गेल्या निवडणुकीत फसविले होते. या निवडणुकीत बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी जागरूक राहून काम करावे. धुळाजी लकडे यांनी सांगितले की, माजी आ. भीमराव धोंडे हे आमदार झाल्यानंतर मतदार संघाला शांतता मिळणार आहे. उपसरपंच चांगदेव एकशिंगे यांनी सांगितले की, माजी आ. भीमराव धोंडे हे शांत, संयमी नेते आहेत. ते अपक्ष उमेदवार आहेत हे चांगले झाले. फळांची अपेक्षा न करता काम करीत राहिल्यास लाभ आपोआप मिळतो. मी गेल्या १४ महिन्यापासून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत काम करीत आहे. त्या कामाचा गावांसाठी चांगला फायदा झाला. कोणाचाही दबाव आला तरी आपण उमेदवारी मागे घ्यायची नाही अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, मतदारसंघाला विकासासाठी माजी आ. भीमराव धोंडे साहेबांची गरज आहे. साहेब सर्वांसाठी काम करतात. मतदारसंघातील गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे यासाठी शाळा महाविद्यालये सुरू केले. विधानसभा सदस्य असताना पाझर तलाव व रस्ते करुन विकास केला. बुथ प्रमुखांनी आपापल्या गावात प्रचाराचे व मतदान करुन घेण्याचे व्यवस्थीत नियोजन करावे.
याप्रसंगी पांडुरंग गावडे , युवराज खटके, सरपंच संजय विधाते, माजी उपसरपंच भगवान काळे, अरुण क्षेत्रे, योगेश विधाते, माजी पं. स. सदस्य संजय धायगुडे, सरपंच भरत जाधव, भरत काळे, कुमार तागड, राधाकीसन सिरसाट, अमोल खटके, माजी सरपंच संजय नालकोल, महादेव पांढरे,कैलास वायभासे व इतरांची भाषणे झाली.
कार्यक्रमास सरपंच तात्यासाहेब नालकोल, सरपंच सावता ससाणे, जि. प. सदस्य सुरेश माळी,उपसभापती नामदेव धोंडे, नानाभाऊ वाडेकर, दत्तोबा शेळके , महेंद्र फुलमाळी,अनिल गायकवाड, सरपंच सोमीनाध गायकवाड, सौरभ दिघे, आवेज सय्यद, दिगंबर मेहेत्रे, म्हातारदेव शेकडे, चेअरमन पांडुरंग धोंडे, माजी सरपंच संजय नालकोल, भाऊसाहेब देसाई, बाबुराव कदम,बाबासाहेब एकशिंगे, भिकाजी दातीर, अशोक अडागळे, सरपंच संजय विधाते, देविदास परकाळे, लक्ष्मण झगडे,अशोक गवळी, नवनाथ शेळके, सावन तागड, सरपंच ठोंबरे, संतोष देशमुख, उपसरपंच माणिक मराठे, बापु पठारे, सागर तळपे, अनिस सय्यद,बाबासाहेब तागड, ग्रा.पं. सदस्य औटे जे.बी.,आशोक माळी ,रामदास औटे,मुकुंद घाटविसावे ,आरुण क्षेत्रे, विलास घाटविसावे ,रावसाहेब मेहेत्रे ,तुकाराम औटे, राधाकिसन शिरसाट, महेश शेळके, नईम शेख, ज्ञानेश्वर मगर, हरिभाऊ जंजिरे, अशोक काळे, काकासाहेब झांजे,नंदकुमार फसले, सरपंच भरत जाधव, परमेश्वर कर्डीले, गणेश पवार, दादासाहेब इथापे, बाबासाहेब एकशिंगे,लक्ष्मण शेळके,माजी सरपंच चंद्रशेखर साके, मच्छिंद्र शेळके, पांडुरंग सायंबर,कृष्णा सायंबर, याकुब शेख, सुभाष काळे, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, सुरेश शेकडे, नवनाथ राठोड, रामकिशन ठोंबरे, अमोल खटके, मुकेश घाटविसावे, संतोष शेळके, संभाजी पांडूळे, सचिन सुंबे, दादा ठोंबरे, भरत चव्हाण, नवनाथ शेळके व इतरांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन दादासाहेब विधाते व कैलास वायभासे यांनी केले.