आष्टी
ashti assembly elections BJP ncp candidate आष्टी विधानसभा मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला द्यायची यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली गाठत यावर भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मात्र या बैठकीतही या जागेबद्दल तोडगा निघाला नाही. राज्यातील अशा दहा जागा प्रलंबित आहे.
राज्यातील विविध विधानसभा मतदार संघामध्ये राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
मात्र ज्या ठिकाणी भाजपची जागा आहे मात्र याच मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचा आमदार आहे अशा जागांवर दोन्ही पार्टीने आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे या जागा नेमक्या कोणाच्या पारड्यात टाकायच्या यावर सध्या खलबते सुरू आहेत.
या वादाच्या जागांमध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या जागेवर विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांनी दावा सांगितला आहे. कारण ते या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. तर याच जागेवर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुरेश धस यांनी दावा सांगितला आहे. भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी विधानसभेची जागा भाजपकडे राहील असे सुतवाच यापूर्वीच केले आहे. मात्र महायुतीच्या फॉर्म्युला मध्ये अशा जागांमध्ये वाद निर्माण झाला असून लवकरच हा वाद मिटेल अशी या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.