भटक्या – विमुक्त मागासवर्गीय समाजाचा महा मेळाव्याच्या निमित्ताने भव्य रॅलीने आष्टी शहर दणाणले

- Advertisement -
- Advertisement -

आष्टी ( प्रतिनिधी)

ashti assembly elections 2024 पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जाती जमाती समाज बांधवांचा संवाद महामेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या निमित्ताने मा.आ. भिमराव धोंडे यांना एकमुखी पाठिंबा दिला.यावेळी झालेल्या प्रचंड रॅलीने आष्टी शहर दणाणले .
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जाती जमाती समाज बांधवांच्या संवाद महामेळाव्याचे आष्टी येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे हे होते. संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून समाज बांधवाची भव्य रॅली काढण्यात आली. वेशीतून शनि चौक, किनारा चौकातून खडकत रस्त्याने भव्य रॅली लक्ष्मी लाॅन मध्ये पोहोचली.

ashti assembly elections 2024
ashti assembly elections 2024


कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के, ॲड. रत्नदिप निकाळजे, युवा नेते अभयराजे धोंडे, जि. प. सदस्या वर्षा माळी, हरिभाऊ जंजिरे, माजी जि. प. सदस्य अशोक सव्वाशे, अशोक खोले, दिलीपराव म्हस्के, माजी सरपंच बाळासाहेब पवार,

भाजपा जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख,संजय कांकरिया, महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त संघटनेचे उपाध्यक्षा ॲड. भाग्यश्री ढाकणे, भाजपा किसान सभेचे अध्यक्ष बबनराव ओटे, युवराज सोनवणे,भटक्या विमुक्त विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत धनवटे,उपाध्यक्ष गोवर्धन जाधव,पाटोदा तालुका उपाध्यक्ष नवनाथ विटकर,

आष्टी तालुकाध्यक्ष अविनाश विटकर, पोपट धनवडे, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पिंपळे,भाजपा तालूका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,विकी शेकडे,
शहराध्यक्ष बाबुराव कदम, चेअरमन राजेश धोंडे, सरपंच दादासाहेब जगताप, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस व इतरांची उपस्थिती होती.


महामेळाव्यात बोलताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मतदारसंघात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. भटक्या विमुक्त व मागासवर्गीय समाजातील लोकांनी आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यावे. सर्वांगिण विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले यांच्या सारखे थोर महापुरुष अत्यंत कष्टातून पुढे येत त्यांनी देश आणि जागतिक पातळीवर नावलौकिक केले.

आज समाजातील सर्व घटकांसाठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत‌. गोरगरिबांनी चा़ंगले शिक्षण घेतले तर त्यांना निश्चितच फायदा होईल. जागतिक पातळीवर आष्टीचे नावलौकिक करणाऱ्या धावपटू अविनाश साबळे यांचे त्यांनी उदाहरण दिले. अविनाश साबळेचा तरुणांनी आदर्श घ्यावा. कोणत्याही निवडणुकीत स्वाभिमान विकू नका, मागास घटकांसाठी शासनाच्या भरपूर योजना आहेत त्यांचा लाभ घ्या.

शिक्षण घेताना गोरगरिबांना सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळतात तसेच परदेशात जाण्यासाठी ही शिष्यवृत्ती मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे म्हणजे गोरगरीबांचे विद्यार्थी उच्चशिक्षित होतील. भाजपाचे आष्टी तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, माजी आ. भीमराव धोंडे यांनी कधीही जातीयवाद केला नाही. २०१४ मध्ये भिमराव धोंडे आमदार असताना हजारों गोरगरिबांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. तसेच मागच्या विधानसभेला व कालच्या लोकसभेला जवळच्या लोकांनी समोरून नाही तर पाठीमागून घात करीत पराभव केला.

युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, या निवडणुकीत धोंडे साहेब सर्व ताकदीनिशी उतरणार आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. २०१४ ते २०१९ या काळात मतदारसंघाचा प्रचंड विकास केला आहे. ॲड. रत्नदीप निकाळजे यांनी सांगितले की माजी आ. भीमराव धोंडे म्हणजे विकासाभिमुख नेतृत्व आहेत मतदारसंघातील सर्व गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे तळागाळातील लोकांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी सांगितले की, मा. आ. भिमराव धोंडे यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. मतदारसंघातील गोरगरीब जनता आणि तळागाळातील लोकांच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. त्यामुळे आज एवढ्या प्रचंड संख्येने समाज आला आहे.


भिमराव धोंडे हे खरोखरच गोरगरीबांचे नेते आहेत. याप्रसंगी राजपाल शेंडगे, बालाजी भोसले, दीपक बोराडे, अनिल गजघाट, शंकरराव देशमुख, युवराज सोनवणे, अडागळे, सुनील शिंदे व इतरांची भाषणे झाली.


यावेळी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील खंडू गिरी, बाबासाहेब ससाणे, बाबासाहेब शिरोळे, गौतम ससाणे, माजी सभापती अनिल जायभाय, सरपंच शशिकला चंदनशिव, माऊली कांबळे, जालिंदर पंडागळे, सुदाम वाघमारे, सुभाष कांबळे, ग्रा.पं. सदस्य आदेश निमोणकर, अभिलाष गाडेकर, बाळासाहेब शिरोळे, नानासाहेब डिडोळ, शंकर बर्डे, प्रविण देवडे, विलास जावळे,आस्ताकभाई शेख, आनंद जावळे, बापु वाल्हेकर, सर्जेराव वाघमारे, सर्जेराव तुपे,सनी काळपुंड, हमिद पठाण, विकास वनवे, छबुताई गायकवाड व इतरांची उपस्थिती होती.

मेळाव्याला मतदारसंघातील महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मेळाव्याला मतदारसंघातील पारधी, भिल्ल, तिरमल, मातंग, हरिजन, गोसावी, चांभार, वडार, कैकाडी व इतर जाती जमातीतील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी सुमारे पाच हजारांहून अधिकचा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.कार्यक्रम संपल्यानंतर चार चाकी बाहेर काढण्यासाठी खडकत रोडवरील लक्ष्मी लाॅन ते आष्टी पर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने आली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe

Latest Articles