का घेतली सुरेश धसांनी जरांगे यांची भेट?

- Advertisement -
- Advertisement -

जालना

Suresh Dhas meets Manoj Jarange patil भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. रात्री उशिरा माजी आमदार सुरेश धस यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केलीय. सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. भाजपचे आष्टी पाटोदा मतदार संघाचे माजी आमदार सुरेश धस यांनी अचानक जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

काल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरागे पाटील यांची त्यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेतली होती. त्यानंतर आता भाल भारतीय जनता पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली याचा तपशील समजला नसला तरी, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात चर्चा झाली असावी, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाला अधिक मतदान झाले. या भागात मनोज जरागे यांना मानणारा मोठा समाज आहे. त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप मतदारांनी भाजप उमेदवारांना बसला आहे. आणि मनोज रंगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार पाडणार असल्याचे जाहीर संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व असल्याचे जणकारांचे म्हणणे आहे. येत्या 20 तारखेला मनोज जरंगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe

Latest Articles