जालना
Radhakrushna vikhe meets Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आता उधाण आले आहे. सर्वच राजकीय मंडळी जरांगे पाटील यांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर त्यांच्या भेटी घेत आहेत. रात्री उशिरा भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उशिरा जरांगे पाटील यांची भेट घेतली.ही भेट का घेतली ? या भेटी मागचा उद्देश काय ? या संदर्भात तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक आहेत. आचासंहिता लागू झाल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार गंभीर नसल्याचे लक्षात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात वेगळी भूमिका घेतली आहे. याचाच परिपाक म्हणून त्यांनी 20 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे मराठा समाजाची बैठक घेणार आहेत.असे जाहीर केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करायचे की पडायचे या बाबत जरांगे या बैठकीत समाजाचं मत जाणून घेणार आहेत. आता पर्यंत 700 ते 800 उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज सादर केले आहेत.
दरम्यान भाजपच्या विरुद्ध जरांगे पाटील यांनी भूमिका घेतल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. याचा फटका विधानसभेत बसणार याची जाणीव भाजपला असल्याने मंत्र्यांची ही भेट त्या संदर्भात असावी असा कयास आहे.
भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.जालन्याच्या अंतरवाली सराटीत रात्री उशिरा राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केलीय. विखे पाटलांनी अचानकपणे अंतरवालीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखेंनी जरांगे यांची भेट घेतल्याने या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालय.