केज विधानसभेच्या जागेवर रिपाइंचा हक्क
बीड/प्रतिनिधी
BJP should share power to RPI Ramdas Athawale राज्यासह देशभरात रिपाइं कार्यकर्त्यांची फार मोठी ताकद असून भाजपाला सत्तेत येण्यासाठी रिपाइंच्या ताकदीची गरज आहे. येणाऱ्या विधानसभेत भाजपाने रिपाइंला 20 जागेवर वाटा देण्याचे काम करावे.तसेच राखीव मतदार संघातील जागेवर रिपाइंचा हक्क असून केजची जागा देखील रिपाइंच्या हक्काची आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बीड जिल्हा रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, यांच्या नेतृत्वात बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित भव्य -दिव्य सत्कार सोहळ्यात केले.
मंत्री रामदास आठवले म्हणाले की, मी केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाल्यामुळे माझे राज्यभर अनेक सत्कार सोहळे झाले. परंतु बीड जिल्ह्याचे लोकनेते पप्पू कागदे यांनी माझा सत्कार सोहळा ऐतिहासिक करून माझा सत्कार भव्य-दिव्य केला. बौद्ध, मांग,चर्मकार, मराठा, मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम करणारे आम्ही आहोत.
संविधान बदलण्याची ताकद कुणाच्या बापात नाही, संविधानासाठी गोरगरीब समाजासाठी व उपाशी पोटी राहणाऱ्या माणसांसाठी आम्ही काम करणारे माणसे आहोत. दलित पॅंथरपासून बीड जिल्हा माझा बालेकिल्ला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही माझी मागणी दलित पॅंथरपासून आहे. मंडल आयोग लागू करण्यासाठी संघर्ष करण्याचे काम मी पॅंथरच्या माध्यमातून केले आहे.
नामांतराच्या लढ्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे फार मोठे योगदान होते. मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. भाजपाने रिपाइंच्या राज्यभरातील ताकदीचा विचार करून भाजपाने आम्हाला सत्तेत वाटा दिला पाहिजे. भाजपला सत्तेत यायचे असेल तर रिपाइंला 20 जागा देऊन त्यात केज मतदार संघाची जागा द्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी सदैव संघर्ष केला.
बीड जिल्ह्यात आल्यावर गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पप्पू कागदेमुळे माझ्या पाठीशी ताकद आहे. त्यामुळे केज आमदार करण्यासाठी मी ताकद लावणार आहे. असे प्रतिपादन मंत्री रामदास आठवले यांनी केले.
ऐतिहासिक भव्य सत्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे म्हणाले की, दिन दलित, शोषित, पीडित, उपेक्षितांना न्याय देण्याचे काम रामदास आठवले दलित पॅंथरपासून करीत आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडळ आयोगाचा लढा उभा केला.ओबीसींना न्याय देण्याचे काम रिपाइंच्या माध्यमातून करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे. 1990 साली समाज कल्याण मंत्री असताना रामदास आठवले यांनी गोरगरिबांना 2 लाख हेक्टर गायरान जमिनी देण्याचे काम केले आहे.
आम्ही रिपाइंचे 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. अन्याय अत्याचारावर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा आम्ही बीडमध्ये ऐतिहासिक केला आहे.रिपाइंची बीड जिल्ह्यात फार मोठी ताकद आहे.
आमचे खच्चीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.असे पप्पू कागदे म्हणाले. याप्रसंगी मिलिंद शेळके,अड ब्रह्मानंद चव्हाण,अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, बाबुराव कदम यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी राजू जोगदंड, माझहर खान, सचिन कागदे, भास्कर रोडे, अशोक साळवे, किशोर कांडेकर, किसन तांगडे, अविनाश जावळे, महादेव उजगरे, अरुण भालेराव, धोंडीराम सिरसाट, दीपक कांबळे, नरेंद्र जावळे, दशरथ सोनवणे,महेश आठवले,गोवर्धन वाघमारे, लक्ष्मण सिरसाट, दासू वाघमारे, उत्तम मस्के, अरुण निकाळजे, बापू पवार, दशरथ शिंदे,ज्ञानोबा माने, सुरेश माने, सादिक कुरेशी, संदिपान डोंगरे, अविनाश जोगदंड, अरुण कांबळे, प्रभाकर चांदणे, सुभाष तांगडे, विलास जोगदंड, भैय्या मस्के, योगेश गायकवाड, श्याम वीर, अक्षय कोकाटे, महेंद्र वडमारे, भाऊसाहेब कांबळे, सतीश शिंगारे, रतन वाघमारे, नामदेव वाघमारे, यांच्यासह हजारो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अड.सुरेश वडमारे, प्रा.बाळासाहेब गव्हाणे यांनी केले.
BJP should share power to RPI Ramdas Athawale रॅलीत निळ्या वादळाचे शक्ती प्रदर्शन
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा बीड शहरात शनिवारी ऐतिहासिक सत्कार सोहळा पार पडला. सोहळ्यापूर्वी राजुरीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य-दिव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी निळ्या वादळाचे शक्ती प्रदर्शन केले.युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या तगड्या नियोजनातून मंत्री रामदास आठवले यांचा बीड येथील भव्य-दिव्य सत्कार सोहळा ऐतिहासिक ठरला आहे.