रेल्वेचे खाजगीकरण कदापी होणार नाही
नाशिक
Railways will never be privatised ashvini vaishnav देशातील आर्थिक दृष्टीने गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या प्रवासाचे साधन म्हणून रेल्वे कडे पाहिले जाते त्यामुळे रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने आर्थिक, संशोधन, सुरक्षा आणि मनुष्य बळाच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. सध्या काही राजकीय पक्षांकडून रेल्वेचे खाजगीकरण करण्यात येईल अशा प्रकारचा भ्रम निर्माण केला जात आहे मात्र रेल्वेचे खाजगीकरण केले जाणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रेल्वे तथा माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नाशिकमध्ये केले.
केंद्रीय रेल्वे बलाचा चाळीसावा स्थापना दिवस आज नाशिकमध्ये मोठे उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक रोड येथे प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात शानदार संचलन करण्यात आलं त्याचे निरीक्षण केल्यानंतर रेल्वेमंत्री वैष्णव बोलत होते गेल्या साठ वर्षांमध्ये रेल्वेमध्ये अपेक्षित गुंतवणूक झाली नाही मात्र 2014 पासून आतापर्यंत रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आले आहेत .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर रेल्वे सारख्या गरिबांच्या प्रवासा साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी आर्थिक निधी दिला आहे पूर्वी रेल्वेला निधी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागत होते आता सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचे स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करून सादर केला जातो.
देशात पाच हजार तीनशे नवीन रेल्वे ट्रॅक तयार करण्यात येत आहेत देशातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 12 हजार जनरल कोच तयार करण्यात येत आहेत. वंदे भारत मध्ये कवच सुरक्षित प्रणाली आहे अशीच सुरक्षा प्रणाली अमृतभारत नमो भारत अशा सर्वच रेल्वेमध्ये देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
देशात जम्मू आणि काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे विस्तार करताना केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांवर मोठी जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना बुलेट-प्रुफ जॅकेट हेल्मेट आणि अन्य सुरक्षा सुविधा दिल्या जातील असेही वैष्णव म्हणाले केंद्रीय सुरक्षा बलाच्या विविध विभागीय प्रशिक्षण केंद्रांचे देखील आधुनिकरण करण्यात येणार असून तेथे सिम्युलेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
नाशिकच्या प्रशिक्षण केंद्राला अद्यावत करण्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे असेही ते म्हणाले केंद्रीय सुरक्षा बलाच्या निरीक्षकांना पदोन्नती ब श्रेणीत पदोन्नती देण्यासाठी लवकरच प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल तसच निम्नस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकच वेळेस पदोन्नती देण्याचा देखील प्रलंबित प्रस्ताव लावण्यात येईल असेही ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय सुरक्षा बलाने विकसित केलेल्या सज्ञान या कायदेविषयक मार्गदर्शन करणाऱ्या मोबाईल अपचे रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस पदके मिळवणाऱ्या सुरक्षा बलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर रेल्वे सुरक्षा बलाचे डी जी मनोज यादव, मध्य रेल्वेचे आय जी एस एन चौधरी उपस्थित होते. यावेळी सुरक्षा दलाच्या नऊ पथकांनी शानदार संचलन केले. परेड कामांडन्ट यतीन बाबुराज यांनी संचालनाचे नेतृत्व केले.