अहमदनगर जिल्हयात “स्वच्छ माझं अंगण” अभियान राबविणार

- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर

नित्य नियमाने स्वच्छते बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी आता कुटुंब स्तरावर ” स्वच्छ माझे अंगण ‘ ‘हे अभियान राबविण्यात येणार आहे १ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर  या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात उत्कृष्ट स्वच्छता असणाऱ्या कुटुंबांचा ग्रामपंचायत  कडून गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर  यांनी दिली.
                 स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -2
अंतर्गत वैयक्तिक शौचालय घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन रावीत असलेले राज्यातील सर्व कुटुंब स्तरावर याची प्रभावी प्रभावीपणे  अंमलबजावणी  होऊन नित्यनियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब वयक्तिक शौचालय सांडपाणी व्यवस्था करता शोषखड्डा/ परसबाग / पाझरखड्डा  घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती  खतखड्डा आणि कुटुंब स्तरावर कचराकुंड्या  याबाबतची उपलब्धता  करून घेतली असून, त्याचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबांना प्रोत्साहन देणे  आणि आणि त्यांची अनुकरण करण्याकरता इतर ग्रामस्थांना, कुटुंब धारकांना त्यांच्याप्रमाणेच वैयक्तिक स्वरूपाच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उद्युक्त करणे ही अभियानाची  संकल्पना आहे.


            सदर अभियानाची अंमलबजावणी करताना वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, सर्व कुटुंब सदस्याकडून वापर वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती  करण्यात कुटुंबांचा पुढाकार, कुटुंब स्तरावर दैनंदिन घनकचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंब स्तरावर  सुका कचरा  कचरा, ओला कचरा कुंड्यामध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खत खड्डा  अथवा घरगुती खत खड्डा निर्मिती करून कचऱ्याचे  , घर किंवा घराच्या परिसरातच व्यवस्थापन करणे. सांडपाणी व्यवस्थापन परसबाग पाझर  खड्डा शोषखड्डा याद्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन घर किंवा घरच्या परिसरातच करणे  सदरील विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या निकषानुसार कुटुंब स्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने  व्यवस्थापन करण्यासाठी  गावातील सर्व कुटुंबामध्ये ‘ स्वच्छ  माझे  अंगण” अभियान राबविण्यात यावे.या बाबींवर भर देण्यात येणार आहे.
            अभियानाची माहिती / सूचना  गावात दवंडी देणे, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा,अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी  सज्जा या ठिकाणच्या सूचनाफलकावर 31 ऑगस्ट पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
          निकषाच्या अनुषंगाने निवडलेल्या कुटुंबाची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित कुटुंब अभियानात पात्र झाली असल्याबाबत लेखी स्वरूपात कळवून त्यांना कार्यक्रमाकरिता निमंत्रित करण्यात याबे. उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना 2 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
             स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -2 अंतर्गत कुटुंब स्तरावरील बाबींचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करून नियमित वापर करतात अशा कुटुंबांना सन्मानित करण्यासाठी श्रीफळ, पुष्प  व प्रशस्तीपत्रक देऊन ग्रामपंचायतीने सन्मान करावा.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व  सर्व ग्रामस्थांनी अभियानात  सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे असे  आवाहन  समर्थ शेवाळे प्रकल्प संचालक जलजीवन यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles