नमो शेतकरी महासन्मानचा चौथा हप्ता व ई-पीक पाहणीची अट रद्द

- Advertisement -
- Advertisement -

        परळी वैद्यनाथ

ई-पीक पाहणीची अट रद्द : परळी वैजनाथ येथे बुधवारी दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न झालेल्या कृषी महोत्सवात नमो शेतकरी महासंन्मान योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता एका क्लिकवर 91 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. यावेळी राज्य सरकार जितके अलर्ट आहे तितकेच अलर्ट शेतकरी सुद्धा असल्याची अनुभूती आली आहे.

      झाले असे की, कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे मिळाले का? असे विचारताच सभागृहात बसलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजेस त्यांच्या मोबाईलवर आले.     त्याचबरोबर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची घातलेली अट मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात रद्द करत असल्याचे जाहीर केले. याचा दुहेरी आनंद झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांचे आभार मानणारे मेसेजेस धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकांकडे पाठवले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles