मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्या – मनोज जरांगे पाटील…..

- Advertisement -
- Advertisement -


हिंगोलीत आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत लाखोंची गर्दी….


हिंगोली

Give reservation to Marathas from OBC only – Manoj Jarange Patil मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या ही आमची मागणी शासनाने मंजूर करावी. अन्यथा मराठ्यांवरचा हा अन्याय सहन केला जाणार नाही. भुजबळांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी सरकारचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे .

आज दिनांक 6 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी मराठा बांधवांची मोठी उपस्थिती होती. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हिंगोली शहरात जमले होते . एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता .

यावेळी मार्गदर्शन करताना ,मराठा समाजाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे , सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी . मराठा समाजाबद्दलची आस्था शासनाने दाखवून द्यावी अन्यथा आगामी काळात राजकीय भूमिका घेऊ. सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे .

शासनाने या प्रकरणी भूमिका घेऊन मराठा समाजाला दिलासा द्यावा अन्यथा विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे आम्ही 13 तारखेनंतर ठरवणार आहोत असे आवाहनही त्यांनी दिले . हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करून ही शांतता रॅली सुरू झाली.

संपूर्ण शहरातून ही रॅली इंदिरा गांधी चौक या ठिकाणी पोहोचल्यानंतर रॅलीला सभेचे स्वरूप आले. हिंगोली शहरात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित आले होते .प्रचंड घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यावेळी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles