माय आणि माऊलीचा सन्मान करणारा अर्थसंकल्प – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई

Budget Honoring Mai and Mauli – State Commission for Women Chairperson Rupali Chakankar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा माय आणि माऊलीचा सन्मान करणारा, आदर करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला. 

‘आजच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसंच वारकरी संप्रदायासाठी महामंडळाच्या स्थापनेची ही घोषणा केली आहे. माऊलीचा सन्मान केल्यानंतर आईचा, बहिणीचा आणि मातृ शक्तीचा सन्मान करताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना 

ज्यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याची ही घोषणा केली. वय २१ ते ६०मधील पात्र महिलांना यात  दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासूनच करण्यात येणार आहे. तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलिंडर मोफत, राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येणार आहेत. बचत गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे, यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा निर्धार आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत अशा अनेक बाबींचा उल्लेख आहे. याव्यतिरिक्त या आधीच्या लेक लाडकी, जननी सुरक्षा, मातृ वंदना अशा योजनांसाठी ही भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.’ असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितलं. 

अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज दहाव्यांदा सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी अनेक भरीव तरतुदी जाहीर केल्या आहेत. अर्थसंकल्पाची सुरुवातच माऊलींच्या गजरानं, त्यांच्यासाठी असलेल्या योजनांनी झाली आणि त्यानंतर लगेच महिलांसाठीचा अर्थसंकल्प वाचून दाखवला यातूनच अजित पवार यांनी माय आणि माऊलीचा सन्मान करणारा अर्थसंकल्प सादर केला असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles