पर्यटन,लोक संस्कृती टिकवली नाही तर मजुरी करावी लागेल

- Advertisement -
- Advertisement -

अकोले , ता . १६:(शांताराम काळे )

पर्यटन वाढले पाहिजे परंतु त्यातून अर्थकारण वाढले पाहिजे त्यातून रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे . सांस्कृतिक ओळख टिकवून पर्यटन वाढते त्याला शाश्वत पर्यटन म्हणतात. अनुभव , जबाबदार , शाश्वत पर्यटन या त्रिसूत्रीवर पर्यटन चालते .    

जगाच्या पाठीवर सर्व लढाई स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे यापुढील काळात आपले अस्तित्व पुसू नये यासाठीसतर्क राहा अन्यथा  काही काळाने कुमशेत आमचे म्हणणारे अनेक जण पुढे येतील,  व तुम्हाला मजूर म्हणून काम करावे लागेल तुमची सांस्कृतिक ओळख टिकली पाहिजे .असे उद्गार महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय चे प्रशिक्षक व सल्लागार मनोज हाडवळे यांनी काढले. तालुक्यातील कुमशेत येथील  .देवराई जंगलात व धारेराव मंदिराच्या प्रांगणात  देवराई फाउंडेशन कुमशेत उदघाटन व पर्यटन संचालनालय आयोजित निसर्ग पर्यटन संधी व आव्हाने या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रसंगी वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी डी . डी . पडवळ , तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी , आदिवासी विकास विभागाचे राजेंद्र करवर, रामनाथ पाचोरे , रमाकांत डेरे , देवराई फाउंडेशन चे अध्यक्ष सयाजी अस्वले , सचिव गंगाराम धिंदळे ,उपाध्यक्ष त्रिंबक धराडे,वाळींबा भैरूले , साहेबराव भारमल , गोविंद मधे , ढवळा मुठे ,ज्ञानेश्वर अस्वले , विठ्ठ अस्वले , नवसू मधे ,दत्तू अस्वले , रंजना अस्वले ग्रामविकास अधिकारी राजगुरू ,सुरेश भांगरे , राजू भारमल , चन्द्र उघडे ,व परिसरातील १५ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते .स्वागत कोंबड नृत्य व आदिवासी तसेच झाडे वाचवा झाडे जगवा गीतांनी  करण्यात आले . प्रास्तविक गंगाराम धिंदळे यांनी केले तर तालुका कृषी अधिकारी , वनपरिक्षेत्र अधिकारी ,आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी यांनी आपले विचार व्यक्त केले .प्रसंगी बोलताना श्री . हाडवळे यांनी येथील तरुण मेहनती आहेत , काही तरी करण्याची त्याच्यात जिद्द आहे . हि सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे गेल्यास तुम्ही कमी वेळात नावारूपास याला व तुमचे ब्रॅण्डिंग होईल . जिथे जिथे तुम्हाला गरज पडेल तिथे कृषी वनविभागासोबतच पर्यटन विभाग तुमच्यासोबत राहील . . पर्यटक हा अनुभव घेण्यासाठी येत असतो येथील खाद्य  संस्कृती , लोक संस्कृती , निसर्ग याचा आनंद घेतो . त्याला नाचणीची भाकर , चुलीवरची  चवीचे जेवण टेन्ट मधील रात्र काढणे हे आवडते त्यासाठी तो खर्च  करतो व अनुभव घेतो त्यालाच अनुभव सिद्ध पर्यटन म्हणतात . कुमशेत परिसरातील परिसर वाचन करून दुर्मिळ पक्षी , वन औषधी वनस्पती , हातसडीचे तांदूळ ,आजोबा , घनचक्कर  , कोकणकडा, याचे गायडन्स पर्यटकांना केल्यास ते या भागात स्थरावतील व पुन्हा पुन्हा येण्यासाठी तयार होतील . त्यासाठी या भागातील रस्ते होणे आवश्यक असून मोबाईलला रेंज नसेल तर चिंता करू नका पर्यटक पर्यटनाचा खरा आनंद घेतील . आभार सयाजी अस्वले यांनी मानले . 

हेही वाचा: मुलींमध्ये पुणे विभागाला तर मुलांमध्ये मुंबई विभागाला विजेतेपद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles