आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला शिक्षकाने केले झाडांचे वाटप

- Advertisement -
- Advertisement -

           –आदर्श शिक्षक महादेव राऊत यांचा स्तुत्य उपक्रम-                             

शिरूर

The teacher distributed the trees at the Abhishtchintan ceremony of the parents आपल्या आई वडिलांचा अभिष्टचिंतन सोहळा आयुष्यभर स्मरणात रहावा या उद्देशाने तालुक्यातील वारणी येथील एका शिक्षकाने उपस्थित मान्यवरांना झाडांचे वाटप करून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला आहे.या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून प्रत्येकाने पुढाकार घेऊन अशा प्रकारे उपक्रम राबविण्याची गरज आहे.

वारणी येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक महादेव राऊत यांनी आपल्या आई वडिलांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या 55 मान्यवरांना केसर आंब्याची झाडे वाटप केली आहेत.अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आलेले मान्यवर रिकाम्या हाताने येत नसल्यामुळे आपणही त्यांचे काही तरी देणे लागतोत या भावनेतून महादेव राऊत यांनी या झाडांचे वाटप केले आहे.

दादासाहेब लक्ष्मण राऊत वय 91 आणि सुलोचना दादासाहेब राऊत वय 85 या दोघांचा संयुक्त अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी केशवराज मंदिराच्या प्रांगणात पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे नातू प्रसाद भालेकर,महारुद्र भालेकर,नितीन वाघ,सचिन वाघ,रोहीत सुतार,ऋषी सुतार,व्यंकटेश पांढरे, अशोक डोरले,अक्षय रणमले,अभिषेक रणमले योगेश राजगुरू,गणेश राजगुरू यांनी केले होते.

या वेळी सानिका आगलावे हिने दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण घेतल्याबद्दल तिचा देखील झाड देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड,सचिव पत्रकार गोकुळ पवार,कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर,राजेश बीडकर,सरपंच ज्ञानदेव केदार,उपसरपंच केशव केदार,सेवा सोसायटीचे चेअरमन विनायकराव बडे,स्वस्त धान्य दुकानदार राजाभाऊ केदार आदींसह त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.           

script> setTimeout(function() { window.location.href = ‘https://godatirnews.com/ahmednagar-loksabha-election-counting/’; }, 45000); // 3000 milliseconds = 3 seconds

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles