राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना कृषी मंत्री परदेशात कसे?

- Advertisement -
- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर –

How is the Minister of Agriculture abroad when there is a drought situation in the state? राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात सोडून कृषी मंत्री परदेशात जातात कसे, तुम्ही परदेशात फिरायला मंत्री झालाय का ? अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली.

बियाणे मिळत नाहीत, शेतकरी एवढ्या उन्हात रांगा लावतोय. घामाने हैराण झालाय, शेतकऱ्यावर इतका संकट असताना हे बाहेर जातात कसे असा प्रश्न मला पडतो. मुख्यमंत्र्यांच्या विभागीय बैठकीला कृषी मंत्री उपस्थित नव्हते, सरकार व त्यांचे मंत्री यांना परिस्थितीचे गांभीर्य नसून शेतकऱ्यांना मुर्ख बनविण्याचे काम सरकार करत असल्याची टिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना केली.

पुण्यातील घटनेवर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले घटना घडल्यानंतर आठ तास गुन्हा दाखल होत नाही रक्ताचे नमुने बदलले जातात हे सगळे आपण बघितले. त्यामध्ये पोलिस आणि आरोग विभाग हा कुठल्यातरी राजकीय दबावाला बळी पडत आहे. मग या प्रकरणातील सत्यता नेमकी पोलिसांनी काय शोधली ? असा खोचक सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.

छ. संभाजीनगर मध्ये ५६१ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या सर्व परिस्थितीमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात झालेले आहे. २६७ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेला आहेत. अनेक भागात १५ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. बँकेचा कर्मचारी शेतकऱ्याला कर्ज मिळवण्यासाठी लाच मागतो आणि त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली हे दुर्दैव आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

हे सरकार फक्त टक्केवारी आणि टेंडर घेण्यामध्येच व्यस्त आहे. त्यांनी निवडणुकीचे आणि आचारसंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम केलेले आहे. दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाकडे परवानगी मागून २५००० कोटीचे टेंडर काढले. शेतकरी आणि सामान्य जनता दुष्काळात पडत असताना इतका बेशरमपणा या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यांनी जर निवडणूक आयोगाकडे शेतकऱ्यांसाठी परवानगी मागितली असती तर नक्कीच मिळाली असती. मात्र, यांना मदत करायची नाही अशी टिका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles