कुस्ती बरोबरीत सुटली;दोन लाखांचे बक्षीस विभागून 

- Advertisement -
- Advertisement -


कडा 
kada maulali baba kustya  येथील मौलाली बाबांच्या यात्रेच्या निमित्ताने झालेल्या कुस्त्यांच्या हगाम्यात  कोल्हापूर येथील मल्ल संतोष जगताप आणि नगरचा मल्ल सुदर्शन कोतकर यांच्यात लढत झाली. ही लढत 10 मिनिटे चालली मात्र दोन्ही पैलवान हे सारख्याच ताकतीचे होते. त्यामुळे चीतपट कुस्ती न होता विभागून बक्षीस देण्यात आले. 

 मौलाली बाबांच्या यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेतील हा शेवटचा दिवस असल्याने आष्टी तालुक्यातील नागरिकांनी कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

बुद्ध पौर्णिमेच्या दिवसापासून या बाबांच्या यात्रेला सुरुवात होते. त्यानंतर दोन दिवस ही यात्रा चालते. या यात्रेसाठी आष्टी तालुक्यातील नागरिक गर्दी करतात. तालुक्यातील ही यात्रा सर्वात मोठी असल्याने या यात्रेसाठी मनोरंजनाचे मोठे खेळ येथे आले होते. मिठाई, खेळण्यांचे दुकाने आणि महिलांच्या साज शृंगाराची दुकाने मोठ्या संखेने थाटली होती.  रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी या यात्रेचा लाभ घेतला. या कुस्त्या लाल मातीत घेण्यात आल्या.

सायंकाळी सुरु झालेली कुस्त्या सायंकाळी उशीरपर्यंत चालल्या. शेवटची दोन लाखाची कुस्ती माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या हस्ते लावण्यात आली. ही कुस्ती कोल्हापूर येथील मल्ल 

संतोष जगताप आणि नगरचा मल्ल सुदर्शन कोतकर यांच्यात झाली. सुमारे दहा मिनिटे या कुस्तीचा थरार सुरु होता. समसमान गुण दोघांचे होते.चीतपट कुस्ती न झाल्याने बक्षीस दोघांना विभागून देण्यात आले. सुदर्शन कोतकर हा पुणे येथे अभिजित खटके पैलवान यांचा शिष्य असून पुणे येथे सराव करत आहे.

यावेळी पंच म्हणून २००५ चे  महाराष्ट्र केसरी सईद चाऊस आणि  शिव छत्रपती पुरस्कार विजेते  बाळासाहेब आवारे यांनी काम पहिले. त्यांच्या साथीला सरपंच युवराज पाटील,रामशेठ मधुरकर हे होते. या वेळी कडा ग्रामपंचायत सदस्य, आणि पदाधिकारी उपस्थित होते. या कुस्त्यांचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. 

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles