पिंपळवाडीच्या जाहीर सभेला जनसागर उसळला, राजेंद्र मस्केंनी ताकत दाखवली ..!

- Advertisement -
- Advertisement -

beed

beed loksabha election pankaja munde campaign भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंनी लिंबागणेश सर्कल मध्ये पिंपळवाडी मध्ये काल महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना समर्थन देण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेला पंचक्रोशीतल्या डोंगर पट्ट्यातून जनसागर उसळला.

 शिवसंग्राम लोकसभा निवडणुकीत ‘तटस्थ’ राहणार

बालाघाटावर मस्केंची राजकीय ताकत पाहायला मिळाल्या नंतर सभेत बोलताना उमेदवार पंकजाताईने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मला खऱ्या अर्थाने मतदार तथा सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आशीर्वादाचे बळ दिसत असल्याने माझा विजय निश्चित झाला. वातावरण चांगले, उमेदवार चांगला, लोकांच्या मनातला उमेदवार हे सार असताना एक संधि मला द्या. मी आपल्या जिल्ह्याचे भाग्य बदलून टाकणार या शब्दात त्यांनी ग्रामस्थाना आवहान केले.

निवडणूक एक युद्ध असून सत्यापानची स्थापना करण्यासाठी तुमची साथ महत्वाची वाटते असेही त्यांनी सांगितले.
पिंपळवाडी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.  व्यासपीठावर माजी आमदार जणार्धन तुपे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डॉक्टर योगेश क्षीरसागर, सर्जेराव तांदळे, कल्याण आखाडे, अमर नाईकवाडे, नवनाथ शिराळे, डॉ.अभय वनवे, डॉ.जयश्री मुंडे, संध्याताई राजपूत, शांतीनाथ डोरले, ह. प. प. सहदेव महाराज, उपसरपंच गणेश बहिरवाळ, रवींद्र कळसाने, विशाल पाखरे, शरद बडगे, शंकर तुपे, महादेव बहिरवाळ, महेश सावंत,
बापुराव जाधव, दिलीप डोंगर, गणेश वाणी यांच्यासह परीसरातील सरपंच उपसरपंच, चेअरमन आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी ग्रामस्थानच्या वतीने पंकजाताई मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उपस्थित जनसमुदया समोर बोलताना पंकजाताईने भूमिका स्पष्ट केली. आपल्या जिल्ह्यातील सर्व सामान्य माणूस प्रामाणिक असून लोकांनी ठरवल्या नंतर राजकीय चमत्कार घडवून दाखवतात. जणार्धन तूपे तात्यांना आमदार केलेच होते. मी तुमच्या समोर सेवा करण्यासाठी संधि मागत असून, माझ्या विरोधात कुणाची तक्रार नाही, उमेदवार पसंतीचा आहे. तर मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्या. संधि मिळाल्या नंतर जिल्ह्याचा विकास करून दाखवणार. रोजगार, पाणी, सिंचन, रस्ते सर्व प्रश्न मार्गी लावणार. विजयाचा मला आता आत्मविश्वास निर्माण झाला. लोकांच्या चेहऱ्यावर विजय दिसत असून, आपला जिल्हा पुरोगामी विचाराचा असल्याने राजकारणात महिलांना  संधि देऊन, सन्मान केला जातो. कोणी आडवे आले तरी महिलांच्या पाठीमागे लोक खंबीरपने उभे राहतात. माझे राजकारण सर्व समावेशक गरिबांच्या कल्याणासाठी आसून, विरोधात बोलण्यासाठी बुद्धीभेद करने एवढाच विषय विरोधकांच्या हातात आहे. माझ्या आयुषात जातीपतीचे राजकारण मी कधीच केले नाही. पाच वर्ष संधि देऊन बघा. विश्वासाला तडा जाऊन देणार नाही.

माजी आमदार जणार्धन तूपे म्हणाले की, जात पात पाहू नका, विसंगत वागू नका, मराठा समाज सर्वाना सोबत घेऊन जाणारा ही आपली मूळ ओळख आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा विकासाचा वारसा पंकजाताई खंबीरपणे चालवतात म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू ही ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्कें म्हणाले डोकेवाडा साठवण तलाव स्वर्गीय  गोपीनाथराव मुंडे यांनी मंजूर केला म्हणून, डोंगरात हरित क्रांति झाली. पंकजाताईने पालवण चौक ते लिंबागणेश चोवीस किलोमीटर रस्ता केला. पिंपळवाडी ते भाळवणी पाच कोटीचा पूल मंजूर केला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या डोंगरपट्ट्यातील रस्ते विकसित केले.

डॉ. योगेश क्षीरसागर, कल्याणराव आखाडे, अमर नाईकवाडे यांची जोरदार भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मारुतीराव तिपाले यांनी केले.

तर आभार प्रदर्शन एडवोकेट सर्जेराव तांदळे यांनी केले.
पिंपळवाडी येथील शहीद जवान स्मारकास पुष्पहार घालून संवाद्य सभा स्थळांपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. निळे भगवे फेटे घालून अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles